शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता

By admin | Updated: May 20, 2014 23:44 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सन २०१२-१३ पासून ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी

नामदेव हटवार - सालेकसा

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सन २०१२-१३ पासून ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी सन २०१३-१४ मध्येही तो प्रकल्प कायम ठेवण्यात आला. चुकांची दुरुस्ती करुन वर्ग १ ते ४ व वर्ग १ ते ७ अशा दोन गटात मूल्यांकन करण्याची व्यवस्था करण्यात आली. मूल्यांकनात यावेळी अनेक शाळांनी केवळ औपचारिकता दाखविण्यासाठी भाग घेतला तर काही शाळांची शोकांतिका निश्चितच समोर आली आहे. त्यामुळे गावची शाळा-आमची शाळा या प्रकल्पाचा उद्देश पूर्णत्वास जाईल काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ‘गावची शाळा आमची शाळा’ हा प्रकल्प यशस्वी करायचा असेल तर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुल्यांकन समितीचे सचिव म्हणून काम करतात. सालेकसात अनेक वर्षापासून गटशिक्षणाधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. प्रभारी म्हणून उसनवारीवर काम सुरु आहे. त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काम होत नाही. खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही पदे एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे कामे करताना वेळेअभावी समस्या निर्माण होतात. तरी पण अनेक शाळांना अचानक भेटी देऊन व शाळेत गैरहजर असणार्‍या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकार्‍यांनी केल्याचे दिसून येते. अनेक शिक्षक मुख्यालयात राहात नसल्याचे यावर्षीही पाहायला मिळाले. त्यांचे अप-डाउन आणि वेळेचे बंधन न पाळता केली जाणारी पळापळी यामुळे तेथील शैक्षणिक दर्जा काय असणार याचा विचारच केलेला बरा. दरेकसा परिसरातील काही शिक्षक पॅसेंजर मिळावी म्हणून ४.३० वाजताच शाळांना दांडी मारुन रेल्वे पकडण्यासाठी येत असतात. हाच प्रकार सालेकसा तालुक्यातील अनेक शाळांत दिसून येतो. त्यामुळे या शिक्षकांचे लक्ष शिकविण्यापेक्षा कमी आणि स्वत:च्या समस्या व अडचणी सोडविण्याकडे जास्त असते. या प्रकल्पांतर्गत अनेक शाळांनी आपापल्या पद्धतीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही शाळांनी या प्रकल्पाची फक्त रकानापूर्ती केली. नोकरी करणे व पगार घेणे एवढाच काही शिक्षकांचा उद्देश दिसून येतो. गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाची अजूनही तालुक्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्या शाळांना मुल्यांकनात ६० ते ७० टक्यांपेक्षा कमी गुण मिळतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्मचारी वर्गालाही नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. समितीच्या मूल्याकंनात काही शाळांमधील दुरवस्था दिसून आली. दर्जेदार शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. मूल्यमापनात शिक्षण विभागाने लोकशाही चौथ्या स्तंभाला डावलून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शाळांतील शिक्षक मुल्याकंनात कमी पडले, त्यांनी सुधारणा करणे आवश्यक आहे. मागच्या वर्षी प्रथम, द्वितीय क्रमांकप्राप्त शाळांचा दर्जा वर्षी माघारला तर नवीन शाळांनी परिश्रमांती पुरस्कार प्राप्त केले, ही त्या शिक्षकांची व गावकर्‍यांची मेहनत आहे. त्यामुळे योजना यशस्वी होवो न होवो, त्याच्याशी आपल्याला काही देणे-घेणे नाही असा विचार जर शिक्षक, कर्मचारी, गावकरी करीत असतील तर शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ होण्यास काहीच वेळ लागणार नाही. काही शाळा एवढ्या दर्जेदार आहेत की तेथील विद्यार्थ्यांनी, पालक समितीने शिक्षकांवर नियंत्रण ठेवलेले आहे. तरीपण शाळांच्या मुल्याकंनात अनुत्तीर्ण शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता आहे, असे दिसून येते. काही शाळांना सुविधा नाहीत, तेथे शिक्षण विभाग सुविधा देणार काय, हा सुद्धा प्रश्न आहे. तरीपण दर्जेदार शिक्षणासाठी सर्वांनी परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.