शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पर्धात्मक व शिस्तप्रिय शिक्षणाची गरज’

By admin | Updated: September 13, 2015 01:43 IST

सांस्कृतीक कार्यक्रम व प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचे प्रदर्शन होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो.

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीचे उद्घाटन : बाल वैज्ञानिकांच्या प्रतिकृ तींचा समावेश सौंदड : सांस्कृतीक कार्यक्रम व प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचे प्रदर्शन होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. आजचा बालक येणाऱ्या काळाचे भविष्य निर्माण करणार. यासाठी स्पर्धात्मक व अनुशासनमय शिक्षणाची गरज असून त्यातूनच भावी पिढीला योग्य दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने येथील आर.जे.लोहिया विद्यालयात आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्घाटन याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य लता दोनोडे, रजनी गौतम, गिरीश पालीवाल, माधुरी सावकर, माधुरी पाथोडे, शिक्षण संस्था अध्यक्ष जगदीश लोहिया, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शरद खंडागळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) घनश्याम पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मेंढे यांनी, भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची आठवण करीत, आजच्या वैज्ञानिक युगात विज्ञान विषयाला सर्वाधिक महत्व असून स्पर्धात्मक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धीक आणि शारिरीक विकास होऊन देश आत्मनिर्भर होणार असे मत व्यक्त केले. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही प्रदर्शनीचे वैशिष्ट सांगून मार्गदर्शन केले. दरम्यान शिक्षण विभागाच्यावतीने पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन कल्पना काळे यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी एम.एस.मोटघरे यांनी मानले. कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्था उपाध्यक्ष आ.न.घाटबांधे, जेष्ठ शिक्षक के.डी.रहेले, मुख्याध्यापक गुलाबचंद चिंधालोरे, मनोज शिंदे, आशा तिवसकर, बाच्छल, प्रभुदयाल लोहिया, कन्हैयालाल लोहिया, राधेश्याम लोहिया, पंकज लोहिया यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (वार्ताहर)