शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ व बेरोजगारीवर राष्ट्रवादी होणार आक्रमक

By admin | Updated: January 10, 2016 02:06 IST

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा येथील विंधेश्वरी राईस मिलमध्ये मंगळवारी (दि.५) पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची सभा : पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती देवरी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा येथील विंधेश्वरी राईस मिलमध्ये मंगळवारी (दि.५) पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश जैन यांच्या अध्यक्षतेत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश ताराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत सभेला नगर पंचायत अध्यक्ष सुमन बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय कश्यप, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तिवारी, वरिष्ठ कार्यकर्ता केशव भुते, तालुका राकाँ सेवादलचे अध्यक्ष छोटेलाल बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या सभेत संघटनविषयक बाबींवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे शेतकरी व दुष्काळ याशिवाय बेरोजगारांच्या विषयाला घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रास्ताविक रमेश ताराम यांनी मांडले. संचालन नंदकिशोर बारसे यांनी केले. आभार नीलेश वालोदे यांनी मानले. या सभेत राकाँच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार या सभेत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष सुमन बिसेन, गटनेता तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती अन्नु शेख, महिला व बालकल्याण सभापती माया निर्वाण, उपसभापती दविन्दरकौर भाटीया, नगरसेवक हेमलता कुंभरे, सीता रंगारी आणि नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक महेश जैन, किसान राईस मिल संस्थेचे अध्यक्ष रामचंद देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, उपसभापती विजय कश्यप आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पक्षाचा गमछा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दुष्काळाला घेऊन मोर्चाची तयारी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व पिकांच्या नुकसानीने झालेले शेतकऱ्यांचे हाल बघता राष्ट्रवादी कॉंग्रेस गंभीर असून हा विषय हाताळण्यासाठी सभेत चर्चा करण्यात आली. एवढेच नव्हे तर या विषयांना घेऊन मोर्चा काढण्याचा पवित्रा दिसून येत असून त्यावर चर्चा करण्यात आली.