शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त तालुक्यात शिक्षक होणार फुल्ल

By admin | Updated: September 13, 2015 01:39 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक ..

सुटीतही काम : तिसऱ्या दिवशीही बदली प्रक्रिया सुरूचगडचिरोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून ही प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शनिवारी १२ सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार असल्याने प्रशासकीय सुटी असली तरी गडचिरोली जिल्हा परिषदेत मात्र बदली प्रक्रिया सुरूच होती. रात्री ८.३० वाजतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. गेल्या दोन दिवसात जिल्हाभरातील शिक्षक, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या बदल्या झाल्या. अहेरी उपविभागातून अनेक शिक्षक व शिक्षक संवर्गातील कर्मचारी आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज आदी उपविभागात बदलीवर पाठविण्यात आले. शनिवारी मात्र पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी समुपदेशनाद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे नक्षलग्रस्त एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी आदी तालुक्यात शिक्षकांची रिक्त असलेली पद आता भरली जातील, अशी शक्यता शिक्षकांनीच व्यक्त केली आहे. स्वत: शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे हे ही गेल्या तीन दिवसांपासून बदली प्रक्रियेत व्यस्त असल्याने त्यांनी बदल्यांच्या आकडेवारीबाबत सांगितले नाही.