शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त सालेकसाचे रस्ते अंधारात

By admin | Updated: May 24, 2015 01:34 IST

सालेकसा तालुका एक नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. नक्षलग्रस्त भागात शासनाकडून विशेष लक्ष देत अनेक भौतिक सोयी सुविधा पुरविण्यावर भर दिला जातो,...

सालेकसा : सालेकसा तालुका एक नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. नक्षलग्रस्त भागात शासनाकडून विशेष लक्ष देत अनेक भौतिक सोयी सुविधा पुरविण्यावर भर दिला जातो, परंतु सालेकसा तालुका आजही अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. यात मुख्य समस्या म्हणजे सालेकसा या तालुक्याच्या मुख्यालयीन अनेक मार्गावर पथदिवेच नसल्यामुळे प्रमुख रस्तेही रात्रभर अंधारात असतात. त्यामुळे सालेकसा येथे रात्रीचा प्रवास धोकादायक वाटतो. सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणाहून रेल्वेने प्रवास करणारे शेकडो प्रवासी रात्री बेरात्री ये-जा करीत असतात. तसेच या ठिकाणावरुन राज्य महामार्ग क्रमांक २४९ गेला असून या मार्गाद्वारे महाराष्ट्रला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश हे दोन्ही राज्य जोडलेली आहेत. त्यामुळे सालेकसावरुन गेलेला रस्ता दिवस रात्र प्रवाशांनी व्यस्त असतो. अशा परिस्थिती सालेकसाच्या रस्त्यावरुन रात्रभर योग्य प्रकारे प्रकाश देणारे पथदिवे नसले दुदैवी ठरत आहे. नक्षलग्रस्त तालुका असल्याने या तालुक्यात दरवर्षी कोणत्या न कोणत्या नक्षली कारवाया घडत असतात.आश्चर्य असे की, एकदा आठवडी बाजाराच्या दिवशी भरदिवसा नक्षली हल्ल्यात एकाचा जीव गेला होता. त्यामुळे सालेकसा मुख्यालय सुद्धा सुरक्षित नाही. असी धारणा लोकांमध्ये रुजली आहे. सालेकसा मुख्यालयापासून अवघ्या एक कि.मी. अंतरापासून जंग़ल परिसर लागला आहे. त्यामुळे ही सालेकसा अनेकांना असुरक्षित वाटतो. अशात येथील अनेक रस्ते रात्रभर अंधारात व सामसूम राहतील तर लोकांना किती सुरक्षित वाटेल किंवा रस्त्यावरुन चालताना भिती वाटेल की नाही या बद्दल प्रशासनाने विचार करावा.सालेकसा मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व प्रकारचे शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय, शाळा कॉलेज, बाजारपेठ इत्यादी असून या सर्व ठिकाणाची रात्रीला सुरक्षा असणे आवश्यक आहे. आणि या साठी सर्वत्र आधुनिक पद्धतीचे पथदिवे शासनाच्या वतीने लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)