शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नवतपाला पावसाचा थंडावा

By admin | Updated: May 31, 2017 01:05 IST

नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने

 पाहिजे तसा तापलाच नाही : पावसाने पारा घसरला लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने नवतपा पाहिजे तसा तापलाच नाही. विशेष म्हणजे मे महिन्यातील उन्हापेक्षा कमी तापमानाची नोंद नवतपात घेण्यात आली आहे. निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाच्या स्वार्थीपणामुळे झाडांचे जंगल नष्ट होऊन सिमेंट कॉंक्रीटचे जंगल वाढू लागले आहे. याचा परिणाम ऋतूचक्रावर झाला असून पर्यावरण प्रदूषीत झाले आहे. उन्हाची दाहकता वाढत चालली असून पावसाळ््यात पाहिजे तसा पाऊस पडत नाही. निसर्गाशी छेडखानीचे हे परिणाम आता आपल्या समोर येवू लागले आहेत. हेच कारण आहे की पूर्वी ४० डिग्रीच्या वर न जाणारे तापमान आता ४५ च्यावर जाऊ लागले आहे. त्यात नवतपा म्हटला म्हणजे रविराज पृथ्वीच्या जवळ येऊन आग ओकू लागल्याचा काळच म्हटला जातो. अवघ्या उन्हाळ््यातील उन्ह या नऊ दिवसांत पडत असल्याचेही नवतपा बाबत बोलले जाते. यामुळेच नवतपा म्हटला की सूर्य सर्व काही भाजून काढणार एवढ्या तापमानाची कल्पना केली जाते. नवतपाच्या या नऊ दिवसांत सूर्य खरोखरच आग ओकून आपली ताकत दाखवून देतात. यंदा मात्र २५ मे पासून सुरू झालेल्या नवतपाला पावसाने आपला थंडावा दिल्याने नवतपा पाहिजे तसा तापला नाही. कारण यंदा नवतपाच्या काळात बहुतांश दिनी वरूणराजाने आपली हजेरी लावून तापमान नियंत्रणात आणले. विशेष म्हणजे नवतपाच्या पूर्वीच्या दिवसांत पारा जास्त चढलेला होता. मात्र नवताप सुरू झाल्यानंतर ढगाळ वातावरणाने पारा उतरल्याचे दिसले. रविवारपासून तर दररोज पाऊस बरसत आहे. विशेष म्हणजे नवतपाच्या पूर्वीच्या काळात यापेक्षा जास्त नोंद घेण्यात आली असल्याने यंदाच्या नवतपावर पावसाने पाणी फेरल्याचे दिसले. रविवारच्या पावसाने वातावरण कुल-कुल नवतपाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी ढगाळ वातावरणामुळे पारा उतरला होता. तर चवथ्या दिवशी रविवारी (दि.२८) पावसाने दमदार एंट्री मारली. रविवारच्या पावसाने जणू पावसाळाच सुरू झाल्याचे चित्र तयार झाले होते. पावसामुळे वातारणात गारवा निर्माण झाला व लोकांची उकाड्यापासून सुटका झाली. एकंदर रविवारच्या पावसाने वातावरण कुल-कुल झाले. सोमवारीही सकाळी ढगाळ वातावरण होते व थंड वारा वाहत होता. त्यामुळे लोकांना उन्हापासून दिलासा मिळाला. दररोजच पावसाची हजेरी रविवारी हजेरी लावल्यानंतर आता दिवसा उन्ह व सायंकाळी मात्र अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस बरसण्याचे सत्रच सुरू झाले आहे. या पावसाने मात्र नवतपालाच फेल केले आहे. दररोज पाऊस बरसत असल्याने तापमानाच चांगलीच घट झाली असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दररोजच पाऊस आपली हजेरी लावून सर्वांनाचा सुखावत आहे. पावसाच्या या आगमनामुळे सर्वांना दिलासा मिळाला असून दररोज असाच पाऊस बरसावा अशी सर्वांची इच्छा आहे.