शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

नवेगाव राष्ट्रीय उद्यान ठरत आहे प्रेमीयुगुलांसाठी एकांताचे ठिकाण

By admin | Updated: August 23, 2015 00:14 IST

गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानासाठी दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची घोषणा होते.

संतोष बुकावन  अर्जुनी मोर.गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानासाठी दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची घोषणा होते. मात्र प्रत्यक्षात हा निधी कुठे जिरतो हे कळायला मार्गच नाही. गेल्या पाच वर्षापासून झालेल्या विकास कामांचे अद्यापही लोकार्पण होऊ शकले नाही. केवळ आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून उलटसुलट उत्तरे देवून अधिकारी मोकळे होतात. लोकप्रतिनिधींना तर काही सोयरसूतकच नाही. अशा दृष्टचक्रात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा विकास खुंटला आहे. या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त होईल का? हा प्रश्न पर्यटनप्रेमींना पडला आहे.नवेगावबांध, इटियाडोह, प्रतापगड या परिसरावर निसर्गाने अमाप सौंदर्याची उधळण केली आहे. एकेकाळी पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली, पक्षिमित्र डॉ.सलीम अली यांच्या वास्तव्यातून हे राष्ट्रीय उद्यान साकारले. सुमारे २५ वर्षापूर्वी या उद्यान परिसरात भेट दिल्यानंतर पर्यटक मोहीत होत असत, पण कालांतराने जसजसा या उद्यानाच्या विकासासाठी निधी प्राप्त होऊ लागला तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने उद्यानाला वक्रदृष्टी लागली. आज या उद्यानाची एवढी अवदशा झाली आहे की, येथे आल्यानंतर पर्यटकांनी नाक मुरडले नाही तर नवलच ! सद्यस्थितीत हे राष्ट्रीय उद्यान राहिले नसून स्कार्फ बांधून येणाऱ्या प्रेमीयुगलांसाठी एक निरव शांततेचे ठिकाण झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री याच मतदारसंघातून निवडून आलेत. विरोधी बाकावर असताना त्यांना या उद्यानाविषयी प्रेत होते. ते यासाठी सत्तापक्षावर आकाडतांडव करायचे. पण हल्ली ते राज्याच्या कारभारात व्यस्त आहेत. उद्यानाच्या विकाससंदर्भात जिल्हाधिकारी व नियोजन अधिकाऱ्यांसोबत केवळ बैठका घेण्यापलीकडे काहीच फलीत नाही. प्रशासकीय यंत्रणा संवेदनशून्य दिसत आहे. उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. प्रत्यक्षात या उद्यानाचा विकास व्हावा ही मानसिकताच दिसून येत नाही.आतापर्यंत राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झाला. मात्र या खर्चाचा कोणी वालीच नाही. वारेमाप खर्च केला जातो. पण झालेल्या कामाचे योग्य मुल्यांकन सुद्धा होत नाही. डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पर्यटन विकास समितीने उपोषण करण्याचे पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून एक महिन्याच्या आत कामे पूर्ण करुन घेण्याचे आश्वासन दिले व उपोषण न करण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत एक सभा लावली. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकार्पणाचे आश्वासन दिले. आजमितीस ८ महिन्यांचा कालावधी लोटला पण लोकार्पण झालेच नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय पर्यटन समिती आहे. त्या समितीच्या पर्यटनसंदर्भात बैठका होतात. या ठिकाणी गार्डन तयार करण्यात आले, त्यावर सुमारे ७८ लाख रुपयांचा खर्च झाला. पाच वर्षापासून या बगिच्यात एकही फुलझाड लागले नाही. या बगिच्याचे प्रवेशद्वार गेल्या पाच वर्षापासून कुलूपबंदच आहे. तो संपूर्ण बगिचा भग्नावस्थेत आहे. संबंधित कंत्राटदाराकडून आम्ही अमक्या तारखेपर्यंत काम करुन घेतल्यानंतर लगेच लोकार्पण करु असा ठराव घेण्यात आला आहे, तसे संबंधितांना निर्देश देण्यात आले. मात्र अद्याप कुठलीच कृती झालेली नाही. याच गार्डनमध्ये स्टेप गार्डन आहे. यावर २२ लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र या उद्यानात कुठेच स्टेप गार्डन असल्याचे दिसते. संगित फवारे कार्यान्वित होऊ शकले नाही. विद्युतीकरणावर आठ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला मात्र एकही दिवा येथे जळत नाही. कंत्राटदाराला बिलाची संपूर्ण राशी दिल्याचे सांगितले जाते. केवळ अनामत रक्कम शिल्लक आहे. काम पूर्ण झाल्याचे कंत्राटदार सांगतो. तुम्ही आपल्या ताब्यात हा गार्डन घेवून लोकार्पण करा असे सांगतो, मग चार वर्षापूर्वीपासून लोकार्पणाची प्रतीक्षा का? यात मोठा घोळ आहे.