शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

झालीया येथे राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:08 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत झालीया अंतर्गत ...

भूमिपूजन : १.१० कोटींची योजना लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत झालीया अंतर्गत एक कोटीं १० लाखांची योजना मंजूर करण्यात आली असून योजनेचे भूमिपूजन करीत झपाट्याने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. योजनेचे काम १८ महिन्यांंंत पूर्ण करण्याची मुदत असली तरी येत्या तीन महिन्यांत काम पूर्ण करुन आॅगस्ट महिन्यापर्यंत लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल असा विश्वास ग्राम पंचायत झालीयाचे सरपंच मनोज दमाहे यांनी व्यक्त केला आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आमगाव-देवरी क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार भेरसिंह नागपुरे, सरपंच मनोज दमाहे, उपसरपंच हेमराज सुलाखे, पोलीस पाटील कविता कुराहे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रिकापुरे, तंमुस अध्यक्ष धरमदास कुराहे, गादीप्रसाद भगत, राजेंद्र शेंडे, ग्रामसेवक प्रिती साखरे व इतर मान्यवर मंडळी आणि गावकरी बांधव उपस्थित होते. वाघनदीच्या काठावर साखरीटोला घाटाजवळ स्थापित होत असलेली ही राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत झालीया अंतर्गत साखरीटोला, झालीया, पोवारीटोला आणि गोंडीटोला या चार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करणारी असेल. या योजनेतून एकूण ७१५ कुटुंबातील तीन हजार २०० लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. ही योजना सुरू झाल्याने झालीया ग्राम पंचायतीतील पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येवर मात करण्यात येईल. त्यामुळे चारही गावातील लोक मोठ्या अपेक्षेने या योजनेकडे बघत आहेत. या योजनेचे श्रेय आ. संजय पुराम यांना दिले जाते. असे उद्गार सरपंच मनोज दमाहे यांनी केले आहे. यावेळी पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी अभियंता व इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुनिता नागपुरे, सालीक भगत, अशोक सुलाखे, कृष्णा कुराहे, प्रतिभा बन्सोड, ईश्वर मेश्राम, लोकचंद दमाहे, लोकेश पटले, सुपचंद पटले, डोमचंद बरैया, सुरेश नवगोडे यांचे सहकार्य लाभले.