शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कावराबांध आरोग्य केंद्राचे आयएसओसाठी नामांकन

By admin | Updated: May 25, 2015 01:14 IST

उत्तम आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून जिल्हा व विभागच काय तर राज्यात ओळख असलेल्या कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यशाची वाटचाल सुरूच आहे.

गोंदिया : उत्तम आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून जिल्हा व विभागच काय तर राज्यात ओळख असलेल्या कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यशाची वाटचाल सुरूच आहे. यंदा तर मागील अनेक वर्षांपासून भौतिक सुविधांपासून आरोग्य सेवेत सतत तत्परता दाखविणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आयएसओसाठी नामांकन झाले आहे. सन २०१२-१३ पासून सतत या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्लीच्या चमू येत असून येणाऱ्या प्रत्येक भेटीत त्यांनी आरोग्य केंद्रातील त्रुट्या दर्शवून त्या पुर्ण करण्याचे निर्देश दिले. त्या सूचनांचे तंतोतंत पालन डॉ. विवेक अनंतवार यांनी आपल्या आरोग्य केंद्रात केले. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आपला आदर्श कायम ठेवल्यामुळे या आरोग्य केंद्राचे आयएसओ करीता नामांकन झाले आहे. या आरोग्य केंद्रात आधुनिकेतची जोड देत प्रत्येक सोयी-सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध केल्या जातात. डॉ. बी.के. मेश्राम जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते तेव्हापासून हे आरोग्य केंद्र आदर्श ठरले आहे. या आरोग्य केंद्रात आताही सर्वात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. शासनाचे सर्व उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी या आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशिल राहतात. आरोग्य केंद्राची स्वतंत्र वेबसाईट असो किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय सर्वात आधी या कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्राने हा प्रयोग करून इतरांसाठीही आदर्श निर्माण केला आहे. आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात तत्पर असलेले कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ प्रमाणपत्र घेण्याच्या तयारीत आहे. या आरोग्य केंद्राने केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील चमू आणखी एकदा येणार. त्यानंतर या आरोग्य केंद्राला आयएसओचे प्रमाणपत्र दिले जाईल. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यातील कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ साठी नामांकण झालेले पहिले आरोग्य केंद्र आहे. (तालुका प्रतिनिधी)