शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दवनीवाडा सेवा सहकारी संस्थेत बँक प्रतिनिधीच्या नावात घोळ

By admin | Updated: June 19, 2016 01:38 IST

विविध सेवा सहकारी संस्था दवनीवाडा र.नं.२५० च्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय क्र.३नुसार सभेत बँक प्रतिनिधी विषयावर चर्चा करण्यात आली.

नियमाला डावलले : अध्यक्ष व सचिवाने केला पदाचा दुरुपयोगपरसवाडा : विविध सेवा सहकारी संस्था दवनीवाडा र.नं.२५० च्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय क्र.३नुसार सभेत बँक प्रतिनिधी विषयावर चर्चा करण्यात आली. दवनीवाडा सेवा सहकारी संस्थेत बँक प्रतिनिधीच्या नावात घोळ केल्याचा आरोप चर्चेत भाग घेतलेलेसदस्य राजेंद्रसिंह मडले व इतर सहा सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. बँक प्रतिनिधी सहकारी कायदा अधिनियम १० (२) अन्वये, संचालक मंडळाने शेतकरी सभासदातून व वार्षिक सभेच्या ठरावानुसार प्रतिनिधीचे नाव सहकारी उपनिबंधक यांच्याकडे पाठवावे असे नियम असताना अध्यक्ष-सचिव यांनी साठगाठ करुन बँकेचे वर्तमान संचालक घनशाम द्वारकाप्रसाद मस्करे यांचे नाव मासिक सभेच्या इतीवृत्तावर घेवून आपल्या मर्जीने लिहून पाठविले. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सात सदस्य गावातील शेतकरी वर्गाने केला आहे. यात भैयालाल सूर्यवंशी यांनी संजय मुन्ना चौधरी यांचे नाव सुचविले असता त्यांच्या नावाची अध्यक्ष, सचिव यांनी दखल घेतली नाही. परिणामी सभेत गदारोळ झाला. अध्यक्ष व सचिवाने धनाढ्यांच्या दबावाखाली येऊन काम केले. अशाच बँक प्रतिनिधीच्या नावाबद्दल प्रत्येक ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात सेवा संस्थेत गैरप्रकार झाला. हा मुद्दा वार्षिक सभेत न घेता मासिक सभेत घेऊन प्रतिनिधीचे नाव पाठविले. सदर ठराव रद्द करण्याची मागणी जिल्हा निबंधक, तालुका निबंधक यांच्याकडे केली आहे. वार्षिक सभेचा अहवाल विषय सूचीनुसार असलेल्या ठरावाला शिक्का मोर्तब करावे अशी मागणी राजेंद्रसिंह मडले, संजय मुन्नालाल चौधरी व सदस्यांनी केली आहे. तसे न केल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)