शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतींचा बिगूल वाजला

By admin | Updated: September 30, 2015 05:18 IST

जिल्ह्यातील सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव व देवरी या नव्याने अस्तित्वात आलेल्या पाच नगर

गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव व देवरी या नव्याने अस्तित्वात आलेल्या पाच नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सोबतच या नगर पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच होत असलेल्या या निवडणुकीबाबत औत्सुक्याचे वातावरण आहे.विशेष म्हणजे नगर परिषदेप्रमाणे ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविली जाणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपले कोण उमेदवार उभे करायचे हे ठरविण्यापासून तर नगर पंचायतीवर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित होईल यासाठी गेल्या काही दिवसांपासून कामी लागले आहेत. आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे या कामाला आणखी वेग येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केल्यानुसार सालेकसा, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव, गोरेगाव व देवरी या नगर पंचायत क्षेत्रात दि.२८ च्या मध्यरात्री १२ वाजतापासून निवडणूक आचासंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व नगर पंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार यांनी आचासंहितेचे पालन काटेकोरपणे होईल याची दक्षता घ्यावी, तसेच आचारसंहितेबाबत तरतूदीचे सर्वतोपरी पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)निवडणुकीची वैशिष्ट्ये पक्षीय चिन्हांवर उमेदवार निवडणूक लढणार. त्यामुळे राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार.प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा दिड लाख रुपये ठेवण्यात आली आहे.नगर पंचायतींमध्ये ५० टक्के महिला आरक्षण राहणार आहे. त्यामुळे महिला उमेदवारांना तयार करताना पक्षांचा कस लागणार आहे.दि.२८ ला मध्यरात्री आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे दि.२९ पासून दि.१ नोव्हेंबरपर्यंत अवघ्या ३३ दिवसांच्या कालावधीत सर्व खेळ करावा लागणार आहे.आमगावची निवडणूक न्यायालयाच्या निकालानंतरआमगाव नगर पंचायतीवर काही स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला आहे. आमगावला नगर पंचायत नको तर नगर परिषदेचा दर्जा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. लगतच्या रिसामा बनगाव, पदमपूरला त्यात समाविष्ठ करून नगर परिषद बनवा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने नगर पंचायतीच्या अध्यादेशावर स्थगनादेश देऊन न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत पुढील प्रक्रिया न करण्याचा आदेश दिला आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम२९ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्रे वाटप करून ते स्विकारले जातील. २ व ४ आॅक्टोबर या सुटीच्या दिवशी सोडून इतर दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र देण्यात व स्विकारली जातील. ९ आॅक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छानणी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. १९ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ आॅक्टोबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होणार असून १ नोव्हेंबरला सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू होईल.