शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतींचा रणसंग्राम सुरू

By admin | Updated: October 2, 2015 06:20 IST

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव व देवरी या चार नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव व देवरी या चार नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. उमेदवारांना आॅनलाईन नामांकन भरण्यासाठी गुरूवार ते गुरूवार (दि.१ ते ८) अशी आठ दिवसांचा वेळ आहे. मात्र पहिल्या दिवशी या प्रक्रियेची पुरेसी माहिती नसल्यामुळे कोणाचे नामांकन आले नसल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले. त्यातच काही राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाही. मात्र दोन ते तीन दिवसात बहुतांश उमेदवारांची तिकीट निश्चित होऊन नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, येत्या १ नोव्हेंबरला नवनिर्मिती ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. मात्र आमगाव नगर पंचायतबाबत आधीच उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे तेथील निवडणूक घेतली जात नाही. त्यात आता सालेकसा नगर पंचायतीवरही आक्षेप घेत उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केल्याने तेथील निवडणुकीवरही न्यायालयाने गुरूवारी स्थगनादेश दिला. त्यामुळे आता निवडणूक रणसंग्रामात केवळ चार नगर पंचायती उरल्या आहेत.ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढविली जाणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष नगर पंचायतींवर कब्जा करण्यासाठी सरसावले आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत बरेच चित्र बदलले. त्यामुळे कुठे कोणाची शक्ती वाढली आणि कोण कमजोर झाले याचे आराखडे बांधले जात आहेत. त्यातच पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावत योग्य उमेदवारांची निवड व्हावी यासाठी राजकीय पक्षांचे नेतेमंडळी उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)११ दिवस मिळणार प्रचारालाउमेदवारांना नामनिर्देशपत्रे आॅनलाईन भरावे लागणार आहे. १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत त्याची मुदत आहे. ९ आॅक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छानणी होणार आहे. १९ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे दि.२० पासून ३० च्या सायंकाळपर्यत म्हणजे प्रचारासाठी जेमतेम फक्त ११ दिवस मिळणार आहेत. या काळात नेत्यांच्या सभा आणि प्रचाराचा धुराळा अत्युच्च शिखरावर राहणार आहे.तहसीलदारांना अखेर मिळाले आयडी व पासवर्डया निवडणुकीसाठी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार हे निवडणूक अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाकडे आॅनलाईन कोणतीही माहिती पाठविण्यासाठी तहसीलदारांना विशिष्ट युजर आयडी आणि पासवर्ड पुरविण्यात येतात. मात्र गुरूवारी नामांकन दाखल करण्याचा पहिला दिवस असताना सुद्धा सायंकाळपर्यंत तहसीलदारांना त्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड मिळाले नव्हते. त्यामुळे ही प्रक्रियाच खोळंबली होती. अखेर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सर्व संबंधित तहसीलदारांना निवडणूक आयोगाकडे आयडी आणि पासवर्ड मिळाले.