शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नाबार्डने केली यंदा पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

मागील २-३ वर्षांपासून काही जिल्ह्यात पीक कर्जाच्या मागणीत घट होत होती. तर काही जिल्ह्यांत पीक कर्ज वसुलीचा आकडा हा वाटपाच्या तुलनेत फार कमी होता. त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे प्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट नाबार्डने ३० ते ४० कोटी रुपयांनी कमी केली होते. त्यामुळे यंदा नाबार्ड नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देमागील वर्षी केली होती कपात : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू आहे. तर खरीप हंगाम सुरू होण्यास अद्याप महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. मात्र ‘लॉकडाऊन’चा शेतीविषयक कामांवर परिणाम होवू नये यासाठी सरकारने शेतीविषयक कामांना यातून सुट दिली आहे. तर नाबार्डने सुद्धा यंदा बँकाच्या पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासा दायक बाब आहे.मागील २-३ वर्षांपासून काही जिल्ह्यात पीक कर्जाच्या मागणीत घट होत होती. तर काही जिल्ह्यांत पीक कर्ज वसुलीचा आकडा हा वाटपाच्या तुलनेत फार कमी होता. त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे प्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट नाबार्डने ३० ते ४० कोटी रुपयांनी कमी केली होते. त्यामुळे यंदा नाबार्ड नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते. संपूर्ण देशभरात मागील १ महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असून तो कमी करण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे याचा कृषी विषयक कामांवर परिणाम होवू नये, तसेच झाल्यास त्याचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होवू शकतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नाबार्डला २५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे नाबार्डने यंदा पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये वाढ केली आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगाम मिळून ११० कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. तर यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी एकूण १५१ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुुलनेत पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ४१ कोटी रुपयांनी वाढ केली आहे. याच प्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यामुळे कृषी विषयक कामे करताना शेतकºयांना अडचण भासणार नाही.शेतकºयांना सर्वाधिक पीक कर्जाचे वाटप जिल्हा बँक करीत असतात. या बँकांमधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया ही राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सोपी असते.त्यामुळे ही बँक शेतकºयांना आपली वाटते. नाबार्डने पीक कर्जाच्या उद्दिष्टात यंदा वाढ करुन दिल्याने ‘लॉकडाऊन’च्या काळात लाखो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.पीक कर्ज वाटपाला सुरूवातशेतकºयांनी खरीप हंगामपूर्व शेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. सध्या शेतकºयांनी खरीपासाठी शेतीच्या नांगरणीसह इतर कामांना सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतीविषयक खर्चाला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बँकांनी सुद्धा १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला सुरूवात केली आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेने आत्तापर्यंत १७६ शेतकºयांना ७२ कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे.सातबारा मिळण्याची अडचणकोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभरात ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू केली आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाºयांची १० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र ग्रामीण भागात तलाठी व इतर कर्मचारी अद्यापही कार्यालयात राहत नसल्याने शेतकºयांना सातबारा काढण्यासाठी अडचण जात आहे. जोपर्यंत सातबारा मिळत नाही, तोपर्यंत शेतकºयांना पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज