शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविणार

By admin | Updated: June 1, 2015 01:47 IST

सधन कृषी पध्दतीत मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

भंडारा : सधन कृषी पध्दतीत मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मृद आरोग्य पत्रिका अभियानात निवड करण्यात आलेल्या गावांची माहिती संबंधित कृषी अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक तीन वषार्नंतर त्याच्या शेताची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन दयावयाची आहे. यामध्ये आगामी तीन वर्षाच्या कालावधीत राज्यातील सर्व गावांची टप्प्याटप्प्याने निवड करुन तीन वर्षात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून त्याच्या जमिनीचा रासायनिक गुणधर्म, स्थिती प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सुक्ष्म मूलद्रव्य कमतरता या स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाचा ७५ टक्के व राज्य शासनाचा २५ टक्के आर्थिक सहभाग राहणार आहे. या योजनेचे प्रमुख उद्देश रासायनिक खतांचा अर्निबंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडुळ खत, सल्फर आच्छादित युरिया सारख्या संथ गतिने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. क्षमता, वृध्दी, कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आणि भारतीय कृषी संशोधन अनुसंधान/ राज्यातील कृषी विद्यापीठांशी सुसंगत सहभागाने मृद तपासणी प्रयोगशाळांच्या कार्यपध्दतीत सुधारणा घडवून आणणे. जमिनीच्या उत्पादकतेविषयीच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यांमध्ये मृद नमुने काढण्याच्या व तपासणीच्या पध्दतीमध्ये समानता आणणे व निर्धारित जिल्ह्यांमध्ये तालुका/ परिमंडळ स्तरीय खतांच्या शिफारशी विकसित करणे. जिल्हयातील एकूण लागवडीखालील क्षेत्र, त्यापैकी बागायती क्षेत्र व जिरायत क्षेत्र व त्यानुसार बागायती क्षेत्रातून २.५० हेक्टर क्षेत्रामधून एक नमुना तर जिरायत क्षेत्रामधून १० हेक्टर क्षेत्रातून एक नमुना या प्रमाणे नमुने काढण्यात येणार असून सन २०१५-१६ या वर्षात एकूण २८० गावातून १७ हजार १२७ नमुने काढण्यात येणार आहेत. (नगर प्रतिनिधी)