शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नावातील ताई-बाईने अनेक अर्ज मिसमॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:14 IST

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. माहिती अपलोड करताना कृषी व महसूल विभागाकडून माहिती भरताना अनेकांचे अर्ज नावातील घोळामुळे अपात्र होत आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : पहिला हप्ता जमा करणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. माहिती अपलोड करताना कृषी व महसूल विभागाकडून माहिती भरताना अनेकांचे अर्ज नावातील घोळामुळे अपात्र होत आहे. कृषी विभागाने माहिती अपलोड करताना काही लाभार्थ्यांच्या नावासमोर ताई तर आधारकार्डवर बाई असा उल्लेख आहे. परिणामी अनेक अर्जाची माहिती जुळत नसल्याने ते अर्ज मिस मॅच होत असल्याने कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जाणार आहे. सध्या या योजनेचा पहिला २ हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार १४२ शेतकरी खातेदार असून यापैकी या योजनेस १ लाख ७२ हजार ८१७ शेतकरी पात्र ठरले. तर यापैकी आत्तापर्यंत १ लाख १६ हजार ९८३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दोन हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड आहे.मात्र पुन्हा या माहितीची खातरजमा करण्यासाठी महसूल व कृषी विभागाकडून महाआॅनलाईन या संकेतस्थळावर शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. मात्र बऱ्याच सातबारावर लाभार्थी महिला शेतकऱ्याच्या नावासमोर ताई असा तर त्यांनी सादर केलेल्या आधारकार्ड व इतर कागदपंत्रावर बाई असा उल्लेख आहे.त्यामुळे महाआॅनलाईन आणि कृषी विभागाची माहिती जुळत नसल्याने असे अर्ज सध्या अपात्र समजून पेडींग ठेवले जात आहे. नावातील घोळ दूर करण्यासाठी घोषणापत्र घेवून त्यांचे अपात्र अर्ज पुन्हा पात्र ठरविले जाणार आहे. मात्र यामुळे याद्या तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटत आहे.अनेक शेतकऱ्यांचे बँक खातेच नाहीजिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नाही. तर बरेच शेतकरी हे जिल्ह्यात राहत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यास अडचण जात आहे.कर्जमाफीचा विसरप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याचे काम जोमात सुरू आहे. मात्र या गडबडीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा विसर पडला. जिल्ह्यातील पाच हजारावर शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे.आचार संहितेपूर्वी काम पूर्ण कराप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने आगामी निवडणुकांच्या तोंडावर केली. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता पुढील चार पाच दिवसात केव्हाही होवू शकते. त्यापूर्वी पात्र सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारची लगबग सुरू आहे. तसे निर्देश सुध्दा संबंधित विभागाला दिले आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाची यंत्रणा सध्या केवळ याच कामात व्यस्त आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना