शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

शुक्रवारी जिल्ह्यात ११ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १ बाधिताने कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेले सर्व ११ रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देआणखी ११ कोरोना बाधितांची भर : ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा १०६ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मागील तीनचार दिवसांपासून वाढत आहे. गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने हा तालुका कोरोनाचा हॉटस्पाॅट होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ११ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १ बाधिताने कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेले सर्व ११ रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६९,९३८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी ५८,१८१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ६८,४१६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी ६२,२१६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,४०० काेरोनाबाधित आढळले असून यापैकी १४,१०९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १०६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. तर, २२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.   

लसीकरणासंदर्भात सूचना नाहीत केंद्र सरकारने जरी १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाईल, असे सांगितले जात असले तरी यासंदर्भातील कुठल्याच सूचना आरोग्य विभागाला मिळालेल्या नाही. तसेच ६० वर्षांवरील किती व्यक्ती आहेत, त्यांची यादीसुद्धा जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आली नाही. त्यामुळे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जिल्हावासीयांनो दुर्लक्ष करू नका लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करा, हात स्वच्छ धुवा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पालन करा. लसीकरण मोहिमेकडे लक्ष केंद्र शासनाने १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू केले जाईल, अशी घोषणा सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात शिक्षकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कोरोना लसीकरण मोहीम केव्हा सुरू होते, याकडे लागले आहे. सात हजार लसी उपलब्ध सध्या जिल्हा आरोग्य विभागाकडे सात हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. पुन्हा लसींची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे. पण, अद्याप नवीन साठा उपलब्ध झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCorona vaccineकोरोनाची लस