शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

आणखी शेतकऱ्यांना मिळाले अटल सोलर कृषी पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:13 IST

उर्जा बचत आणि शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवित

गोंदिया : उर्जा बचत आणि शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या अटल सोलर कृषी पंप योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या २८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यात आले. वीज वितरण कंपनीने आणखी १३ अर्जदार शेतकऱ्यांचे वर्क आॅर्डर काढले असून १३ लाभार्थी शेतकऱ्यांचे काम सुरू आहे. नियमित विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे व भार नियमन असल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औष्णिक पध्दतीच्या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात भर पडत असून हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी आता ‘अटल सोलर कृषी पंप’ योजनेअंतर्गत सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले व त्यातुनच सौर कृषीपंप योजना पुढे आली. आॅगस्टपासून ही योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्याला १९५ कनेक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. एकंदर कृषीपंपाना सौर उर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी ताटकळत रहावे लागणार नाही. शिवाय वीज बिलाची थकबाकी असल्यास होणारी पंचाईत व वीज चोरीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शिवाय वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारापासून शेतकरी मुक्त होऊन आपल्या शेतीला कधीही पाणी पुरवठा करू शकणार हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. जिल्ह्यात १११ लाभार्थी शेतकऱ्यांना डिमांड नोट देण्यात आली आहे. यातील ४७ लाभार्थ्यानी पैसे भरले असून २८ कामे पूर्ण झाली आहेत तर १३ शेतकऱ्यांचे विभागाने वर्क आॅर्डर काढले असून सध्या १३ शेतकऱ्यांचे काम सुरू आहे. म्हणजेच जिल्ह्यातील २८ शेतकऱ्यांकडील पंप सध्या सौर उर्जेवर चालत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिवाय लवकरात लवकर उर्वरीत अर्जदारांना त्यांचे कनेक्शन देण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)