शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावच्या खरेदी केंद्रात धानाला पावसाचा फटका

By admin | Updated: May 25, 2016 02:03 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा मार्केटिग फेडरेशनच्या वतीने धान खरेदी केंद्र देण्यात आले.

शेतकऱ्यांचा रोष : अखेर तोलाई सुरूगोरेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा मार्केटिग फेडरेशनच्या वतीने धान खरेदी केंद्र देण्यात आले. पण अचानक धानाची तोलाई थांबवल्यानंतर मंगळवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजता आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे धान पाण्यात सापडले. यामुळे शेतकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला. अखेर मार्केटिंग व्यवस्थापकाला पाचारण करून शेवटी ४.३० वाजता तोलाई सुरू करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात १० ते १२ शेतकऱ्यांनी ३०० क्विंटल धान विक्रीसाठी आणून ठेवले होते. एका शेतकऱ्याच्या धान मोजणीवरून विनाकारण वाद घालून धान मोजणी थांबवण्यात आली व १० ते ११ शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. यातच अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा धान पाण्याखाली आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने शेवटी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तालुका खरेदी विक्री संस्थाध्यक्ष डॉ.झामसिंग बघेले, खंडविकास संचालक डेमेंद्र रहांगडाले यांच्यासह कर्मचारी उपस्थित झाले. शेतकऱ्यांचा रोष अनावर होऊ नये म्हणून खरेदी विक्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरीत तोलाई सुरू करण्यास सांगितले. पाण्याने ओला झालेला धान गोडावूनमध्ये टाकण्यास सांगितल्याने शेतकऱ्यांनी संभावीत नुकसानीपासून सुटकेचा श्वास सोडला. पण शेतकऱ्यांनी अशा पध्दतीने मोजमाप रोखणे चुकीचे असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आलेला धान त्वरीत मोजमाप करून चुकारे द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)