शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांना मिळावे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण

By admin | Updated: January 15, 2017 00:38 IST

आजच्या विज्ञान युगात शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देणे ही काळाची गरज झाली आहे.

संजय पुराम यांचे प्रतिपादन: मल्हारबोडीतील डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन देवरी : आजच्या विज्ञान युगात शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुध्दा तशी तयारी ठेवावी, असे प्रतिपादन आ.संजय पुराम यानी केले. जि.प.विभागांतर्गत पंचायत समिती देवरी येथील चिचेवाडा केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा मल्हारबोडी येथील डिजीटल वर्गखोलीच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा क्षेत्रात झपाट्याने लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या डिजीटल शाळा आणि त्यासाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षक व पालकवर्गाचा आभार व्यक्त केला. विद्येची देवी माता सरस्वती व शिक्षण जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली डिजीटल वर्गखोलीचे आ. पुराम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पं.स.सभापती देवकी मरई, जि.प.सदस्य सरिता रहांगडाले, पं.स.सदस्य अर्चना ताराम, भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदिप लांजेवार, सरपंचा खोब्रागडे, कुरसुंगे, गटशिक्षणाधिकारी साकुरे, शिक्षण विस्तार अधिकारी दिघोरे, गटसमन्वयक लोकनाथ तितराम, गटसाधन केंद्रातील सर्व विषयतज्ञ उपस्थित होते. डिजीटल वर्ग खोलीच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी चिचेवाडा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शा.व्य.स.अध्यक्ष व सरपंच यांची कार्यप्रेरणा कार्यशाळेचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी विषय तज्ञांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजीटल शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डिजीटल शाळा करण्यासाठी अधिक लोकांनी सहकार्य करून गोंदिया जिल्ह्यातून शिक्षण क्रांती घडवून आणू असा संकल्प केला. प्रास्ताविक केंद्रप्रमुख जी.एम.बैस, संचालन बंसोड तर आभार मुख्याध्यापक खेडीकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहायक शिक्षक खांडवाये यांच्यासह सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती मल्हारबोडी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)