शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाची अर्धवट असलेली कामे पूर्ण होणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:30 IST

सालेकसा : लॉकडाऊन कालावधीत मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीचा प्रश्न मनसेने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. ...

सालेकसा : लॉकडाऊन कालावधीत मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीचा प्रश्न मनसेने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. यावर प्रशासनाने दखल घेत कोरोना काळातील प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत १० मजूर कामे करु शकतील असे सांगितल्याप्रमाणे मनरेगाची अर्धवट असलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे व आस्थापना बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील मनरेगाअंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांना सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ग्रामीण क्षेत्रात मनरेगाशिवाय इतर कोणतेही काम नसल्याने मजुरांचा उपजीविकेचा प्रश्न उदभवला होता. तहसीलदार कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय कामे सुरु करता येणार नाही, अशी माहिती दिली. मागील वर्षीही अशीच परिस्थिती उद्‌भवली असता तत्कालीन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी २५ कामगारांना घेऊन कोरोना-१९ च्या सर्व अटींचे पालन करत कामे सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. याचा दाखला देत राहुल हटवार यांनी उपजिल्हाधिकारी (मनरेगा) गोसावी यांना संपर्क साधला व ग्रामीण क्षेत्रातील मजुरांच्या समस्या मांडल्या. त्यावर तोडगा काढत त्यांनी एका कामावर फक्त दहा कामगारांना ठेवता येईल. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत कामे सुरु ठेवू शकता येतील अशी माहिती दिली. यासंबंधी सालेकसा तहसीलदार कांबळे यांनी सुद्धा उपजिल्हाधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क साधून सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यावर तत्काळ कार्यवाही करत गोसावी यांनी दहा मजुरांना घेऊन कामे सुरु ठेवा. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन पाहिजे असे सांगत कामे सुरु करण्याचे आदेश दिले.