शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राने केले बंधाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:53 IST

शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे.

ठळक मुद्देडांर्गोली येथे बंधारा बांधणार : निविदा प्रक्रिया आटोपली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे. डांर्गोली येथे नदीत हा बंधारा बांधला जाणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया आटोपली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सोसावी लागली होती. गोंदिया शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र सुध्दा कोरडे पडले होते.यावर तोडगा म्हणून कधी नव्हे ते सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होेते. जिल्ह्यात प्रथमच असा हा प्रयोग करावा लागला होता.त्यामुळेच मागील वर्षी शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटली होती. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व पाटबंधारे विभागाच्या सामंजस्यातून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यात आली होती. यंदाही पाणी टंचाईची तीच स्थिती असून जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार यात शंका नाही. अशात पाणी टंचाईची झळ शहरालाही बसणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. भविष्यातील हे चित्र बघून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने यंदाही शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी आरक्षीत करून ठेवले आहे. त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती दिसल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जावू नये, यासाठी मजीप्राने बंधाऱ्याचे नियोजन करून ठेवले आहे.मजीप्राने नदीत बंधारा बांधकामासाठी निविदा काढली असून सुमारे ५-६ लाखांचा यासाठी खर्च येणार असल्याची माहिती आहे. यात रेतीच्या पोतींचा बंधारा बांधला जाणार असून ४ महिन्यांसाठी त्याच्या देखरेखीची तरतूद करण्यात आली आहे. ऐनवेळी धावपळ होवू नये या दृष्टीने मजीप्राने बंधाºयाचे अगोदरच नियोजन केले आहे.या बंधाºयामुळे प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जाणार नाही व शहराला पाणी पुरवठा करण्यात अडचण येणार नाही.मार्च अखेरपर्यंत पुरणार पाणीडांर्गोली येथे नदीत मार्चच्या शेवटपर्यंत पाणी पुरणार एवढा पाणीसाठा असल्याची माहिती आहे. सध्या डांर्गोली येथील पंपाला पाणी येत असून पाण्याची गरज मार्च महिन्यात शेवटी पडणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कधी आणायचे यासाठी मजिप्राकडून नियोजन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. मात्र लवकरच या विषयाला घेवून अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात पाणी आणण्यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मजिप्राचे विभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली.