शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर बांधकामाच्या आदेशाची प्रत गहाळ

By admin | Updated: July 7, 2016 01:59 IST

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये प्राथमिक-माध्यमिक शाळा दुरूस्ती व बांधकामासाठी एकूण ४१०.५० लाख रूपये मंजूर आहेत.

कारवाईची मागणी : शाळा दुरूस्ती काम रखडलेगोंदिया : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये प्राथमिक-माध्यमिक शाळा दुरूस्ती व बांधकामासाठी एकूण ४१०.५० लाख रूपये मंजूर आहेत. सदर कामे जिल्हा वार्षिक योजनेची असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होतात. मंजूर बांधकामाच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाची मूळ प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५ एप्रिल २०१६ रोजी पाठविण्यात आलेली आहे. मात्र ही प्रत गहाळ झाल्याचा आरोग जि.प. सदस्य कैलाश पटले यांनी केला आहे.सदर कामे गावठान अंतर्गत येत असल्याने त्या ग्रामपंचायतद्वारे करारनामे करावे, असे निकष आहेत. बांधकामाचे करारनामे ग्रामपंचायत करताना मंजूर बांधकामाच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाची मूळ प्रत (सत्यप्रत) करारनाम्यासह जोडणे गरजेचे असते. तेव्हाच रितसर करारनाम्याची कार्यवाही होते. परंतु करारनाम्याला झेरॉक्स प्रत लावल्याने ग्रामपंचायतसोबत होत असलेले करारनामे वित्त विभागात अडून पडलेले आहेत. करारनामे अडल्याने ज्या शाळांतील वर्गखोल्यांचे छत २१ मे २०१६ रोजीच्या वादळी वाऱ्याने उडले, अशा शाळांची दुरूस्ती करण्यास अडचण निर्माण झालेली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी २५ एप्रिल २०१६ ला आपले पत्र लावून प्राथमिक-माध्यमिक शाळा दुरूस्तीच्या बांधकामाच्या प्रशासकीय मान्यतेची मूळ प्रत अवलोकनासाठी आपल्याकडे मागितले होते, असे जि.प. सदस्य कैलाश पटले यांनी कळविले आहे. अशावेळी आता दोन महिने लोटूनसुद्धा त्यांनी प्रशासकीय मान्यतेची मूळ प्रत आपल्याकडे ठेवलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला सार्वजनिक बांधकाम विभागासोबत करारनामे करताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी अडचण निर्माण झाली असून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना कुठे बसवावे, अशी समस्या आहे. संबंधित करारनाम्यामध्ये अडचण निर्माण करणाऱ्या विभागातील व्यक्तींवर रितसर चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. सदस्य कैलाश पटले, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी केली आहे.