शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकाचा गैरकारभार

By admin | Updated: July 16, 2016 02:10 IST

तिरोडा तालुक्यात प्रतिनियुक्तीवर आलेले गोरेगाव तालुका कृषी कार्यालयांतर्गत चोपा कृषी मंडळाच्या बोटे येथील कृषी सहायक ...

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग? : नाना इलमे अपहार प्रकरण काचेवानी : तिरोडा तालुक्यात प्रतिनियुक्तीवर आलेले गोरेगाव तालुका कृषी कार्यालयांतर्गत चोपा कृषी मंडळाच्या बोटे येथील कृषी सहायक नाना इलमे यांनी मुलांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी व अनेक बोगस कामे करून कोट्यवधी रूपये लुबाडले. आता या सहायकाला वाचविण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करीत असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे त्या कृषी सहायकाला रजेवर जाण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. कृषी सहायक नाना इलमे यांनी तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान आणि एकात्मिक पाणलोट विकास अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली. मात्र वास्तविक पाहता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केली. इलमे यांनी मार्च ते जून २०१५ ची दैनंदिनी माहिती अधिकारात दिली. त्यात कामे सुरू होण्यापूर्वीच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. कोट्यवधींची कामे असताना महाराष्ट्र दर्शन व मुला-मुलींचे लग्न असताना कामावर उपस्थित असल्याचे दाखवले आहे. चुकीची दैनंदिनी, अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणुकीची तक्रार १२ मे २०१५ ला तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोरेगाव, मंडळ कृषी अधिकारी व पर्यवेक्षक गोरेगाव, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया यांना करून चौकशी आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. चोपाचे (गोरेगाव) मंडळ कृषी अधिकारी मेडे व पर्यवेक्षक यांनी त्यांच्या दैनंदिन कार्याला मंजुरी दिली. अर्थात त्यांनी केलेले शासकीय केलेले कार्य बरोबर असल्याचे मान्य केले. यासाठी आपण दैनंदिनी तपासली असता त्याचे पुरावे आपणाकडून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. २० जून २०१५ ला माहितीच्या अधिकाराखाली दैनंदिनीनुसार कृषी सहायकाकडून माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. जा.क्र. तामंडळक्रणम/२२५/ २०१६ दिनांक ९ जून २०१६ अन्वये मंडळ कृषी अधिकारी चोपा (गोरेगाव) यांनी कृषी सहायक इलमे यांना २३ मे २०१६ ला पत्र देण्यात आले. परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले नसल्याने माहितीचा खुलासा देत नसल्याचे सांगितले. तसेच मंडळ कृषी अधिकारी स्तरावर गुन्हा नोंदविता येत नसल्याचेही पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. कार्यालय मंडळ कृषी अधिकारी चोपानुसार (दिनांक २८ जून २०१६) त्यांनी २० जून २०१६ ला माहिती व केलेल्या कारवाईचा अहवाल मागण्यात आला. मात्र मुद्दे क्रं.१ ते ८ ची वैयक्तीक माहिती देता येत नसल्याचे पत्र मंडळ कृषी अधिकारी मेडे यांनी दिले. सेवाकाळातील दैनंदिनी वैयक्तीत कशी? वैयक्तिक कामकाज मंडळ कृषी अधिकारी व पर्यवेक्षक कसे मंजूर करतात? वैयक्तिक कामकाज मंजूर करण्याचे अधिकार पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकाऱ्यांना आहेत का? असे प्रश्न निर्माण होतात.(वार्ताहर) वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पाठराखण कृषी सहायक इलमे यांच्या संपूर्ण खोट्या कार्यात, भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे नाकारता येत नाही. तालुका कृषी अधिकारी तिरोड्याला प्रतिनियुक्तीवर कामाचा व्याप पाहता पाठवतो व त्या सहायकाची प्रवास रजा सवलत मंजूर करतो. मंडळ कृषी अधिकारी मेडे व पर्यवेक्षक कृषी सहायकाच्या घरी लग्न समारंभात जातात आणि कामावर असल्याची दैनंदिनी पास करतात. शासकीय कामांना कृषी सहायकाचे वैयक्तीक कामे सांगून दिशाभूल करतात. उपविभागीय अधिकारी नाईनवाड खोट्या डीपीई मंजूर करतात, असे अनेक उदाहरणे आहेत. कृषी सहायकाला खोटे कामे करवून घ्यायला लावणे व रूपये कमवून द्यायला लावणे. त्यामुळेच कृषी सहायकाला पाठबळ दिला जातो, अशी नागरिकांत चर्चा आहे.