शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दूध,साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

गोंदिया : जिल्ह्यात दूध आणि साखर याचे दर जवळजवळ सारखेच आहेत. दूध आणि साखर दोन्ही ४० रुपयाच्या घरात आहेत. ...

गोंदिया : जिल्ह्यात दूध आणि साखर याचे दर जवळजवळ सारखेच आहेत. दूध आणि साखर दोन्ही ४० रुपयाच्या घरात आहेत. परंतु दूध आणि साखरपासून तयार होणारी मिठाई मात्र सहा ते दहा पटीने विक्री केली जाते. मिठाई तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कमी किंमतीला असताना सणासुदीच्या काळात मिठाईच्या किमतीत वाढ केली जाते. प्रत्येक मिठाईवर १० ते २० रुपये किलो मागे दर वाढविला जातो. आता गणेशोत्सव असताना आताही या मिठाईची किंमत वाढली आहे. गणेशोत्सव गेल्यानंतर पुन्हा जुनेच रेट सुरू होतील. पुन्हा दिवाळी आल्यावर परिस्थिती जैसे थे होऊन जाईल. दूधाची जास्तीत जास्त किंमत गोंदिया जिल्ह्यात ४० रुपये लिटर आहे. साखरेचीही किंमत कुठे ४० तर कुठे ४२ रुपये प्रति किलो आहे. परंतु दूध आणि साखर मिळून तयार करण्यात आलेल्या मिठाईची किंमत कमीत कमी ३२० रुपये प्रति किलो आहे.

.................................

का वाढले दर

१) मागणी अधिक आणि पुरवठा कमी असला की कोणत्याही वस्तूचे दर वाढतात. परंतु आता सणासुदीचा काळ असल्याने मिठाईवर पाच-दहा रुपये वाढणे स्वाभाविक आहे. परंतु आता मिठाईचा भाव वाढलेला नाही. जुन्याच पध्दतीने मिठाईची किंमत सुरू आहे.

- रामसिंग राजपुरोहीत

..............

गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवात मिठाईला पाहिजे तेवढी मागणी नाही. दिवाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. दूध, साखर याच बरोबर मिठाई तयार करण्यासाठी विविध वस्तूंची गरज असते. त्यावर मेहनत असते. त्यामुळे मिठाईचे दर दूध आणि साखरेपेक्षा अधिक असतात.

- जयलालसिंग राजपुरोहीत

...............

दरांवर नियंत्रण कुणाचे?

मिठाईचा दर दुकानदार स्वत:च ठरवितात. मिठाईचा दर कुणी ठरवित नाहीत. हे दर कमी जास्त होतात. परंतु या दरावर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

............

ग्राहक म्हणतात..

आमच्याकडून दूध खरेदी करताना ३० ते ४० रूपये लिटर मागे दिले जाते. परंतु मिठाई घेण्यासाठी दुकानात गेल्यावर ३२० रुपये किलोच्या दराने मिठाई घ्यावी लागते. ग्राहकांचे हे शोषण आहे.

- योगेश खोटेले, डोंगरगाव.

.....

आम्हाला मिठाई खरेदी करायची असेल तर दुकानदार सांगेल त्या भावात खरेदी करावे लागते. भाजीपाला खरेदी करताना भाव करून खरेदी केला जाते परंतु मिठाई घेतांना भाव करूच दिला जात नाही. मागेल तेवढ्या किंमतीत मिठाईचे पैसे मोजावे लागतात.

- अनिल कठाणे, शंभूटोला (आमगाव)

..............

मिठाईचे दर प्रतिकिलो

मिठाई--------सध्याचा दर---- गणेशोत्सवाच्या आधीचा दर

पेढा----------३२०----------------३२०

बर्फी----------३६०---------------३५०

काजू कतली-- ७२०--------------७००

बंगाली मिठाई-३२०-------------३१०