शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या रिक्तपदांमुळे मेडिकल ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच मागील दोन महिन्यात १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून मेडिकलमधील दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे१५ डॉक्टरांचा आतापर्यंत राजीनामा : आरोग्य विभागाचे रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र येथे अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव असून इमारतीचा प्रश्न सुध्दा अजुनही मार्गी लागेला नाही. तर कार्यरत डॉक्टर सुध्दा राजीनामा देऊन परत जात आहे. परिणामी डॉक्टरांच्या रिक्त पदांचे डोंगर वाढत असून या रिक्त पदांमुळे मेडिकलच ऑक्सिजनवर येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यविषयक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात त्यांची नागपूरला जाण्याची पायपीट कमी व्हावी यासाठी गोंदिया येथे मेडिकल मंजूर करण्यात आले. मेडिकलची स्वतंत्र इमारत तयार होईपर्यंत मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार मागील चार वर्षांपासून या दोन्ही इमारतीतून मेडिकलचा गाडा हाकला जात आहे. मात्र अद्यापही इमारत बांधकामाला सुरूवात झाली नसल्याने मेडिकल व्यवस्थापनाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच मागील दोन महिन्यात १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून मेडिकलमधील दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.मेडिकलच्या बाह्यरुगण तपासणी विभागात सध्या दररोज ७०० रुग्णांची तपासणी केली जात आहे. मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवर सुध्दा ताण वाढत आहे. मात्र अद्यापही ही रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाने कुठलीच पाऊले उचचली नाही.त्यामुळे येथील समस्येत आणखीच भर पडली असून मेडिकलची सेवा आॅक्सिजनवर आल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय