गोंदिया : जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फरपट होते. गंभीर रुग्णांसाठी स्ट्रेचरचा वापर करावा करावा लागतो. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात ४० स्ट्रेचर उपलब्ध आहेत. स्ट्रेचरसाठी कोणत्याही रुग्णाला वाट पाहावी लागत नसली तरी अटेंडंटकरिता निश्चितच वाट पाहावी लागते. अटेंडंटच्या प्रतीक्षेत रुग्णांना १५ ते २० मिनिटे स्ट्रेचरवरच वाट पाहावी लागते. कधी अटेंडंट उपलब्ध झाला तरी एकच अटेंडंट येतो. त्याच्या मदतीला नेहमीच रुग्णांच्या नातेवाईकांची मदत घेतली जाते. कधी-कधी तर नातेवाईकच रुग्णांना स्ट्रेचरवरून नेतात. वैद्यकीय महाविद्यालयात ६२ अटेंडंट आहेत ते सर्व अटेंडंट कंत्राटी आहेत. अटेंडंटच्या कामात कंत्राटी स्वरुपात असलेल्या सिक्युिरटी गार्डचीही मदत घेतली जाते.
कोट
रुग्णावर उपचार त्वरित व्हावेत, यासाठी अटेंडंटची वाट न पाहता स्ट्रेचर आम्ही ढकलत ऑपरेशन थिएटरपर्यंत नेले. यात कमीपणा नसून आमच्या रुग्णावर उपचार व्हावा, यासाठी आम्ही वाट बघितली नाही.
- मोहीत फुंडे, रुग्णाचा नातेवाईक
कोट
डॉक्टरांनी आमच्या रुग्णाला तपासण्यासाठी शस्त्रक्रियागृहात आणायला सांगितले. परंतु यावेळी अटेंडंट उपलब्ध नव्हता. आमच्या रुग्णाचा उपचार वेळेवर व्हावा, यासाठी स्ट्रेचर ओढून त्या स्ट्रेचरवर आमच्या रुग्णाला मांडून आम्ही ओटीमध्ये नेले.
- अजय शेंडे, रुग्णाचा नातेवाईक
कोट
वैद्यकीय महाविद्यालयात ४० स्ट्रेचर असून, ६२ अटेंडंट आहेत. नेहमीच अटेंडंट सेवेत असतात. परंतु एखाद्या दुसऱ्या कामात अटेंडंट असेल, तर रुग्णांना स्ट्रेचरवरून नेण्यासाठी नातेवाईकही स्वत:हून मदत करतात. कंत्राटी स्वरुपात असलेले ६२ अटेंडंट आमच्याकडे कार्यरत आहेत.
-नरेश तिरपुडे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया.
.......
रुग्णालयाचा दररोजचा ओपीडी ३५०
रुग्णालयात उपलब्ध स्ट्रेचर ४०
..........