गोंदिया : गोंदियात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मानस राज्य सरकारचा होता. मात्र या मेडीकल कॉलेजसाठी जागा उपलब्ध नसल्याने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने या कॉलेजच्या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. यामुळे यावर्षी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया होऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षांपासून मेडिकल कॉलेज गोंदियात सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले जात होते. राज्यसरकारने २०१२ मध्ये राज्यात पाच ठिकाणी मेडीकल कॉलेज सुरू करण्याची मान्यता दिली होती. त्यात गोंदियाचाही समावेश होता. गेल्या काही वर्षापासून या मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने २०१२ मध्ये राज्यात पाच मेडिकल कॉलेज सुरू करण्याची मान्यता दिली होती. त्यात गोंदियाचाही समावेश केला होता. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडे कॉलेजचा प्रस्ताव २८ सप्टेंबर २०१२ रोजी पाठविला होता. नोडल अधिकारी म्हणून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे व डॉ. नंदकिशोर राऊत यांची नियुक्ती करण्यात आली होती. कॉलेजची इमारत पूर्ण होर्इंपर्यत सर्व सोयींनी युक्त असलेल्या केटीएस जिल्हा रुग्णालय व गंगाबाई महिला रुग्णालयात वर्ग सुरू करता येतील असेही प्रस्तावात नमूद होते. कुडवा ग्रा.प. नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु या प्रस्तावाला संपूर्ण १० हेक्टर जागेचा उल्लेख नसल्याने एमसीआयने या महाविद्यालयाच्या प्रस्तावाला स्थगिती दिली. कॉलेजसाठी कुडवा येथील शासकीय दूध केंद्रासमोरील १५ हेक्टर झुडपी जंगलाच्या जागेपैकी १० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी पाच हेक्टर जागा राज्य सरकारने आपल्या अधिकारातून दिली. उर्वरित पाच हेक्टर जागेसाठी केंद्र सरकारच्या भोपाळ येथील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील वनविभागाला ३१ लाख ३० हजार रुपये दिले. उर्वरित पाच हेक्टर जागेसाठी भोपाळ येथील वन विभागाच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला. मात्र तो प्रस्ताव मंजूर होण्याआधीच राज्य सरकारने झुडपी जंगलामुळे रखडलेल्या प्रकल्पासाठी संबंधित जमिनीचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा शासन निर्णय केंद्र सरकारकडून मंजूर करवून घेतला. या धामधुमीत या कॉलेजसाठीच्या पाच हेक्टर जागेचा नेत्यांना विसर पडला. (तालुका प्रतिनिधी)
जागा उपलब्ध नसल्याने मेडिकल कॉलेज अडले
By admin | Updated: May 11, 2014 00:23 IST