शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांना १० रूपयांत दोन वेळचे जेवण

By admin | Updated: September 8, 2014 00:36 IST

वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट शासनाने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

नरेश रहिले गोंदियावाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट शासनाने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना दोन वेळचे जेवण देण्याची सोय आरोग्य यंत्रणेला करावी लागते. या दोन वेळच्या जेवणासाठी शासन फक्त १० रूपये देत असल्याने या पैश्यात दोनवेळचे जेवण तर सोडाच साधा नाश्ताही मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना दोन वेळचे जेवण आरोग्य विभागाने द्यावे असे १९९० च्या शासन निर्णयात नमूद आहे. तेव्हापासून आतापर्यंत याच शासन निर्णयाच्या आधारे जेवणासाठी पैसे दिले जात आहेत. दोनवेळच्या जेवणासाठी फक्त १० रूपये आरोग्य संस्थेला दिले जातात. या १० रूपयांत भात, वरण, भाजी, पोळी, त्यांच्या लहान मुलांसाठी दूध, अंडी व केळी देण्यात यावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. आज १० रूपयांत साधा नास्ता मिळत नाही तर दोनवेळचा संकरीत आहार कसा देणार हा प्रश्न डॉक्टरांपुढे उभा ठाकला आहे. या संदर्भात डॉक्टरांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले. मात्र ते याकडे लक्षच घालीत नाही. पैसे नसल्यास रूग्ण कल्याण समितीच्या निधीतील पैसे खर्च करा असे सांगून ते मोकळे होतात. मात्र रूग्णकल्याण निधीचा पैसा औषधीवर खर्च करावा कि जेवणावर खर्च करावा असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. १० रूपयांत रूग्णांना दोनवेळचे जेवण सोडा एकवेळचेही जेवण देणे शक्य होत नसल्यामुळे अनेक संस्थांत रूग्णांना जेवण दिले जात नाही. परिणामी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवर परिणाम पडत आहे. १० रूपयांत जेवण देणे शक्य नाही म्हणून प्रत्येक डॉक्टर दर मासिक सभेत या विषयावर पाठपुरावा करतात. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात असा सूर डॉक्टरांमध्ये आहे. जेवण मिळत नसल्याने रूग्ण येत नाही. रूग्ण न आल्यास त्याचा परिणाम कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवर होतो. शस्त्रक्रिया कमी झाल्यास जिल्हाधिकारी यांचा प्रशासकीय कारवाईचा बडगा डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर येतो. या प्रकारामुळे डॉक्टरांवर मोठे दडपण आहे.