गोंदिया : मातंग समाज महासंघ व मुक्ता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त जयंती सोहळा रविवारी (दि.२४) एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पार पडला. याप्रसंगी मुक्ता महिला बचत गटाच्या अध्यक्ष शीतल खळसे, मातंग समाज महासंचाचे प्रचारक सुनिता इंगळे व ज्योत्स्रा वानखेडे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी समाजाच्या उत्कर्षात महिलांची भूमिका तसेच राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व मुक्ता साळवे यांचे परिवर्तनाचे विचार यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून बचत गटाचे उपाध्यक्ष ब्रह्मकला वानखेडे यांनी, महिला सक्षमीकरण हा समाजनिर्मितीचा पाया आहे. प्रगतिशील समाजनिर्मितीसाठी शिक्षणाच्या जोडीला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी उद्योजकतेचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यानंतर विद्यार्थिनी प्रियंका डुंडे, रक्षिता तायवडे, गोल्डी बिसेन, विद्यार्थी चंदन वानखेडे यांनी ‘राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनसंघर्ष व परिवर्तनाचे पर्व’ याबाबत माहिती दिली. याप्रसंगी महामानवांच्या परिवर्तनवादी विचारांच्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या वेळी गोंदिया, भंडारा व बालाघाट जिल्ह्यातील समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन मालू खडसे यांनी केले. आभार अंजू तायवडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शीतल चव्हाण, सुमन लोखंडे, शीला गवळी, कांचन खडसे, दीपिका बावणे, कीर्ती डोंगरे, नीता डुंडे, माया तायवडे, आशा डुंडे, भागवत बिसेन, शीला बावणे, महासंघाचे सर्व तालुका संयोजक, संघटक, जिल्हा संयोजक, संघटक यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
मातंग समाज महासंघाचा संयुक्त जयंती कार्यक्रम
By admin | Updated: January 28, 2016 01:51 IST