शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया स्थानकासाठी मास्टर प्लॅन

By admin | Updated: December 31, 2016 01:28 IST

गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनविण्याचे निर्देश दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे

महाव्यवस्थापकांचे निर्देश : आणखी विकास कामे होणार, डेम्यू शेडचे लोकार्पण गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनविण्याचे निर्देश दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्रकुमार यांनी दिले. शहराच्या सिव्हील लाईन परिसरात जुन्या लोको शेड परिसरात निर्मित डेम्यू शेडच्या लोकार्पणासाठी गोंदियात आले असताना त्यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी खासदार नाना पटोले उपस्थित होते. रेल्वे स्थानकात पत्रकारांशी बोलताना सत्येंद्रकुमार यांनी गोंदिया स्थानकाच्या विकासासाठी केल्या जाणार असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. दपूम रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांना स्थानिक खासदार, विधानसभा-विधान परिषद सदस्यांची एक कमिटी बनविण्यात यावी व पुढील २० वर्षांनंतर गोंदिया रेल्वे स्थानक कसे असावे, याचे नियोजन आतापासूनच करावे, असे निर्देश दिले. यावेळी दपूम रेल्वेचे नागपूर विभागाचे डीआरएम अग्रवाल, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शिवराजसिंह, रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी गोंदिया रेल्वे स्थानक व डेम्यू शेडच्या विकासाठी मागील वर्षी १०.५० कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती सत्येंद्रकुमार यांनी दिली. एवढीच रक्कम आणखी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोंदिया स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवरून नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांची लाईन जोडण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांना तेथून सोडण्यात येत नाही. यामागे प्लॅटफॉर्म-२ ची लांबी कमी असून ती लांबी वाढविण्याचे काम सुरू असल्याचे कारण त्यांनी सांगितले. आधी विदर्भ एक्सप्रेसला होम प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येणार आहे. गोंदियावरून प्रवाशांची संख्या कमी होत असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर) गुड्स शेडबद्दलचा प्रस्ताव गायब? ४गोंदिया रेल्वे स्थानकावरील गुड्स शेडला गंगाझरी किंवा हिरडामाली येथे हलविण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून आहे. जवळपास एक वर्षापूर्वी हे गुड्स शेड हिरडामाली येथे स्थानांतरित करण्यास मंजुरी मिळाली. यावर जवळपास १२ कोटी रूपयांच्या खर्चाची तरतूद आहे. मात्र सत्येंद्रकुमार यांनी सांगितले की, सदर प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डात पाठविण्यात आला आहे. यावेळी उपस्थित असलेले खा. नाना पटोले यांनी सांगितले की, ते केंद्राच्या त्या रेल्वे कमिटीचे सदस्य आहेत व त्यांनी असा कोणताही प्रस्ताव रेल्वे बोर्डाला मिळाला नसल्याचे सांगितले. जवळपास एका वर्षापूर्वी पाठविलेले हे प्रस्ताव कुठे लटकले आहे, याची माहिती कोणत्याही अधिकाऱ्याजवळ नव्हती. अन् डीआरएम आले आवेशात ४प्रवासी संघटनांच्या अनेक प्रतिनिधींनी खूप तीव्र व आक्रमकपणे प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे नागपूरचे डीआरएम अग्रवाल आवेशात आले. ड्रामाचे गोपाल अग्रवाल यांनी गोंदिया, इतवारी, चांदा या महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांशी सापत्न व्यवहार होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सर्वकाही छत्तीसगडलाच दिले जात आहे. त्यांनी नागपूर रेल्वेला पश्चिम रेल्वेसह जोडण्याची मागणीही यावेळी केली.