शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा आनंद बदलला विलापात, विवाह स्थगित

By admin | Updated: December 22, 2016 00:55 IST

गोरेलाल चौकातील बिंदल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत अजमेरा कुटुंबातील दोन जावयांचा मृत्यू झाला.

गोंदिया : गोरेलाल चौकातील बिंदल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत अजमेरा कुटुंबातील दोन जावयांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजमेरा कुटुंबातील विवाह समारंभही स्थगित करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंकज साडी सेंटरचे मालक चिनू अजमेरा यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा अ‍ॅड. प्रणव दुर्ग येथील परिवातील मुलीसह २१ डिसेंबरला दुपारी १ वाजता देवरी येथील रूप रिसोर्टमध्ये विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात सहभागी होण्यासाठी अजमेरा परिवाराचे जावई इंदोर येथील रहिवासी रविंद्र जैन (५४) व महू येथील रहिवासी सुरेंद्र हिरालाल सोनी (६३) गोंदिया आले होते. दोन्ही हॉटेल बिंदल प्लाझा येथे २० डिसेंबरच्या रात्रीला थांबले होते. २१ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजता ते देवरीसाठी निघणार होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.तेथेच दुर्गवरून मुलीच्या पक्षाकडील मंडळीसुद्धा देवरीला पोहोचणार होते. देवरी येथील रूप रिसोर्टमध्ये लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. जावई देवरीला निघण्यापूर्वीच भीषण अग्नितांडव घडले. त्यात सदर दोघांचा मृत्यू झाला. हॉटेलमधून मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तेथे उत्तरीय तपासणीनंतर अजमेरा कुटुंबीयांचे नातलग आपल्या जावयांचे मृतदेह घेवून रवाना झाले. प्रकाशचंद्र अजमेरा कुटुंबात दोन मुली होत्या. दोन्ही मुलींच्या पतींच्या मृत्यूमुळे अजमेरा कुटुंबीय शोकमग्न झाला आहे. विवाह कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे.