शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती राष्ट्रवादीच्या हातात

By admin | Updated: September 15, 2015 04:19 IST

सडक-अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत पटकावल्यानंतर सोमवारी (दि.१४)

सडक अर्जुनी : सडक-अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत पटकावल्यानंतर सोमवारी (दि.१४) झालेल्या सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. अविनाश काशिवार यांची सभापती म्हणून तर आनंद अग्रवाल यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. दुपारी १.३० वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. राष्ट्रवादीकडून डॉ.अविनाश काशिवार यांनी तर उपसभापतीपदासाठी आनंद अग्रवाल यांनी नामांकन दाखल केले. भाजपा-काँग्रेस युतीचे सभापतीपदासाठी वसंत गहाणे तर उपसभापतीपदासाठी आणि निताराम देशमुख यांनी नामांकन दाखल केले.१९ सदस्य असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ सदस्य राष्ट्रवादीच्या हातात होते. त्यापैकी एक सदस्य निवडणूक प्रक्रियेत भाग घेणार नव्हता. त्यामुळे १० सदस्य राष्ट्रवादीजवळ होते. त्यापैकी एक सदस्य मुन्ना अग्रवाल अपक्ष म्हणून निवडून आल्याने ते राष्ट्रवादीच्या गटात सामील होते. काँग्रेस-भाजप गटाचे ८ सदस्य निवडून आले होते. सभापतीपदासाठी डॉ. अविनाश काशिवार यांना ११ मते तर वसंत गहाणे यांना ७ मते पडली. तसेच उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे आनंद अग्रवाल यांना १० तर काँग्रेस-भाजप समर्थित मिताराम देशमुख यांना ८ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीने आपला गड कायम कायम ठेवला. या निवडणुकीच्या वेळी राकाँचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, जि.प.सदस्य मिलन राऊत तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आ.राजेंद्र जैन यांची त्यांनी भेट घेतली. राकाँ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. (तालुका प्रतिनिधी)