कालीमाटी : कट्टीपार येथील महसूल मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात २० आॅगस्ट रोजी विस्तारित समाधान योजना राबविण्यात आली. याप्रसंगी नायब तहसीलदार एस.आर. पवार, मंडळ अधिकारी डी.एम. मेश्राम, कृषी सहायक ए.एम. एनगंटीवार, सचिव ढोमणे, सरपंच दुर्गा मेहर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. या वेळी संबंधित विभागातील तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तहसील कार्यालय आमगावतर्फे महाराष्ट्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम विस्तारित समाधान योजनेची सविस्तर माहिती डी.एम. मेश्राम यांनी दिली. मोहिमेत कृषी खात्यातील शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या योजना, सन २०१३ च्या अतिवृष्टीत झालेली नुकसान भरपाई, सन २०१५ मध्ये पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे अर्ज घेणे, वर्ग २ चे वर्ग १ करणे, ट्रस्टला जागा प्राप्त करुन देणे, नैसर्गिक आपत्ती आगीमुळे नुकसान, श्रावणबाळ पेंशन योजनेचा लाभ मिळावे, असे अनेक अर्ज घेण्यात आले. नागरिकांनी बँक खाते व आधार क्रमांक गावातील तलाठी यांच्याकडे द्यावे, अशी सूचना मेश्राम यांनी दिली.या वेळी राजेंद्रसिंह सोमवंशी, धनीराम मटाले, सुरेंद्र कोटांगले, मंगेश फरकुंडे, तारेश्वरी गौतम, रमेश स्वघरडे, राजू बावनथडे, विद्यालय मेश्राम, ओमप्रकाश चुटे, कमल चुटे, संजय मते, हुकूमचंद बोहरे, गणेश हर्षे, पवन चुटे, यशवंत टेंभरे, डुंडीलाल गौतम, भरत मडावी आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)
विस्तारित समाधान योजनेचे अनेक अर्ज
By admin | Updated: August 24, 2015 01:48 IST