शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनुस्मृती दहन दिन साजरा

By admin | Updated: December 28, 2016 02:43 IST

समता सैनिक दलाच्या वतीने सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथील धम्मकुटीत दोन दिवसीय धम्मसंमेलन घेण्यात आले.

गोंदिया : समता सैनिक दलाच्या वतीने सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथील धम्मकुटीत दोन दिवसीय धम्मसंमेलन घेण्यात आले. याप्रसंगी मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला. समाजाच्या सुरक्षेसहच स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांचे संरक्षण करणे हे समता सैनिक दलाचे उद्देश्य आहे. या उद्देशाची पूर्ती व जनचेतना निर्माण करण्यासाठी भदंत संघधातू व भिक्षू संघाद्वारे रविवार (दि.२५) सकाळी रॅली काढण्यात आली. यात ३०० सैनिकांचा लाँग मार्च निघाला. रॅलीचे नेतृत्व डॉ. अजय अंबादे, अनिता जांभूळकर, प्रा. के.एम. भैसारे यांनी केले. दुपारी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे आगमन धम्मकुटीत झाले. तेथे त्यांनी दान दिलेल्या थाईलँड येथील बुद्धमूर्तीचे लोकार्पण भदंत संघधातू यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. तसेन ना. बडोले यांनी धम्मकुटी डव्वाच्या विकासासाठी ५० लाख रूपये देण्याची घोषणा केली. भिक्षू संघ व समता सैनिक दलाद्वारे त्यांचा शाल देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमित संबोधी, के.एम. भैसारे, बाबुलाल इलमकर, अनिता जांभूळकर, निशा तागडे, आसाराम वैद्य, सांगोळकर व दलाचे सैनिक उपस्थित होते. यानंतर मनुष्य जातीच्या उत्कर्षाला हानीकारक, स्त्रियांच्या विकासात बाधक व बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या मनुस्मृतीची प्रत जाळण्यात आली व मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. या वेळी सडक-अर्जुनी, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव, आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातील समता सैनिक दलाचे ३०० सैनिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)