शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी गोंदिया जिल्ह्यातील ‘मंडई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:49 IST

ग्रामीण भागातील गावागावात मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एका उत्सवच. आधुनिक व गतीमान युगात पारंपारिक उत्सव व संस्कृती लोप पावत चालली आहे. मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे.

ठळक मुद्देपंरपरेची जोपासना वर्तमान युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक युगाचा पिढीवर पगडा आहे. मनोरंजनासाठी टेलीव्हीजन, मोबाईल सारखी साधने आलीत. लोक सुशिक्षित झाली. गावागावात बाजार भरायला लागले. लोक शहाराकडे धाव घ्यायला लागले. सर्व सुविधा घरी बसून उपलब्ध होत अ

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील गावागावात मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एका उत्सवच. आधुनिक व गतीमान युगात पारंपारिक उत्सव व संस्कृती लोप पावत चालली आहे. मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे. या मंडईत विविध वस्तुंच्या खरेदीचे आकर्षण, आप्तेष्टांच्या भेटींची असणारी ओढ, पाहुण्यांचा पाहुणचार व सरबराई आणि मनोरंजनासह विविध नाटके, दंडार, पोवाडे व कीर्तनाच्या माध्यमातून होणारे समाज प्रबोधन असायचे. वर्तमान स्थितीत यापैकी बऱ्याच गोष्टी मंडईतून हद्दपार होताना दिसत आहेत. काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टींचे आकर्षण कमी झाले असले तरी समाज प्रबोधन लोप पावत केवळ आणि केवळ मनोरंजनच शिल्लक राहिल्याने ही बाब खटकणारी आहे. त्यातही अनेक ठिकाणी ‘डान्स हंगामा’ च्या नावावर रात्री चालणाऱ्या अश्लील नृत्यांनी मंडईतील पावित्र्यच धोक्यात आणले आहे.मंडई हा पूर्व विदर्भात जोपासला जाणारा एक उत्सव आहे. पारंपारिक पद्धतीने हा उत्सव ग्रामीण भागात विशेषत: दिवाळी पर्व संपल्यानंतर सुरू होतो. या काळात गावागावात मंडईची धूम असते. दिवाळीच्या तिसºया दिवसापासून म्हणजे भाऊबिजेपासून झाडीपट्टीत गावोगावी मंडईचा जत्रोत्सव असतो. तो कार्तिकपर्यत चालतो. मंडई म्हणजे नजीकच्या गावातील अनेक दंडारींचा जलसा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.मंडई म्हणजे एक प्रकारचा बाजार. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात बाजार भरत नाही. गावातच सौंदर्य प्रसाधनांसह इतर साहित्य उपलब्ध होण्याची ही सुविधा असते. मंडईच्या काळात शेतकऱ्यांचे पिक निघलेले असते. सासुरवाशीणींना वस्तुंची खरेदी करुन द्यावी. याशिवाय मंडईच्या निमित्ताने घरात आलेल्या पाहुण्यांना पाहुणचाराशिवाय मनोरंजनासाठी गावात नाटक, तमाशा, लावणी यासारख्या लोककलांची मेजवानी दिली जाते. मंडईच्या निमित्ताने बाहेरगावी नोकरी, रोजगारासाठी गेलेली मंडळी घरी स्वगावी परत येतात. त्यांच्या भेटीगाठी हा उद्देश असतो. या काळात गुलाबी थंडी असते. घरी आलेल्या गोतावळ्याची पूर्णत: सुविधा होत नाही. यासाठी त्यांना मनोरंजनाची मेजवानी दिली जाते असाही एक समज आहे.ग्रामीण भागातील शेतकरी वर्षभर शेतात राबतात. पीक उत्पादन हाती आलेल्या पैशातून वर्षभराचा शिण घालवायचा जावई-माहेरवाशिणी, मुलगा-सासुरवाशिणी व नातवंडांना मेजवानी द्यायची, हा सुद्धा मंडईचा एक उद्देश असतो. सासरी कामांनी आलेल्या सासुरवाशिणी भाऊबिजनिमित्ताने माहेरी मंडईत आलेल्या असतात. ही मंडई, मंडईनिमित्ताने माहेरची सरबराई व मनोरंजनात्मक कार्यक्रमातून त्या सासुरवासाचे सारे क्लेश विसरतात आणि नव्या उभारीने पूर्ववत कामाचा गाडा उपसण्यास पूर्वी सारख्याच सज्ज होतात.

मंडईत तंट्याचे आकर्षणमंडईत प्रामुख्याने दंडार दाखविली जाते. यात दाखविण्यात येणारा तंट्या खास आकर्षण असते. हल्ली मंडईचा ट्रॅक बदलला आहे. दंडारीचेही स्वरुप बदलले आहे. पूर्वी हातापायांना धारदार तलवारी टोचलेला रक्तबंबाळ तंट्या पाहून लहान मुलांची भीतीने अक्षरश: बोबडी वळायची. खोडकर मुलांना घरातली आई वर्षभर या तंट्याचीच भिती दाखवायची व त्याने केलेली खोड मोडून काढत त्यावर चांगले संस्कार घालण्याचा प्रयत्न होत असे. त्यामुळे त्याकाळी मुलांना संस्कारक्षम बनविण्याचे एक उत्तम साधन म्हणूनही याकडे पाहिले जात असे.

दंडारी नामशेष होण्याच्या मार्गावरकाळाच्या ओघात दंडारी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पुरातन कलाकृती जोपासणारी मंडळी आता उरली नाही. आजच्या पिढीला याचे आकर्षण नाही. पूर्वी पोवाडा, गणगवळण, लाकडी टाहारा या वस्तू दंडारीत दिसायच्या. तुणतुण्या वाजायच्या. ढोलक वादक आपल्या विशिष्ट शैलीत पाय मटकवून ढोलकीवर थाप द्यायचा. भारुड, पोवाडा, गणगवळण हे सुमधूर संगीत मोहीत करणारे होते. विविध वेशभूषा करुन दंडार सादरकर्ते नाचून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवायचे. पुरुष मंडळी स्त्रीचे वेश व वस्त्र परिधान करुन लोकांना आकर्षित करायचे. सर्कशीतील विदूषकाप्रमाणे दोन व्यक्ती लाकडी साहित्य घेवून विविध आवाज काढायचे. परंतु हे कलावंत आता कमी होऊ लागली आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिक