शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मर्द को दर्द नही होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी आता देशाने जास्तीतजास्त लसीकरणावर जोर दिला असून त्यानुसार अवघ्या देशात लसीकरणाची एक चळवळ राबविली ...

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी आता देशाने जास्तीतजास्त लसीकरणावर जोर दिला असून त्यानुसार अवघ्या देशात लसीकरणाची एक चळवळ राबविली जात आहे. यांतर्गत, जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नवनवीन प्रयोग हाती घेण्यात आले आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असून त्या लाटेला लसीकरणातून मात देण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनानेही आपली कंबर कसली असून लसीकरण मोहीम छेडली आहे. जिल्ह्याला १०० टक्के लसीकरण करण्यासाठी शहरापासून ते ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. शिवाय विशेष शिबिरांचे आयोजन करून त्यातूनही नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परिणामी जिल्हा लसीकरणात तीन लाखांकडे वाटचाल करीत आहे. बुधवारपर्यंतची आकडेवारी बघता जिल्ह्यात २९३१४६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त असून तब्बल १३५२५० नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात लसीकरणात महिलांच्या तुलनेत पुरुषच पुढे असून दोघांमध्ये १४०० एवढे अंतर आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाला घेऊन नागरिकांच्या मनात एक भीती व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ते कोरोनाची लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. त्यात इंजेक्शन म्हणताच महिलांना घाम फुटत असून त्यातूनही महिला लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. असे असताना मात्र पुरुषांनी ‘मर्द को दर्द नही होता’ हे दाखवून देत महिलांवर मात करीत लसीकरणात बाजी मारली आहे.

----------------------------------

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण - २९३१४६

पुरुष - १४६५७३

महिला- १४५१७३

---------------------------------

कोट

कोरोना लसीकरणाला घेऊन काही वेगवेगळ्या गोष्टी कानी पडत होत्या. त्यामुळे त्याचे काही परिणाम होतात असे वाटत होते व त्यामुळे आतापर्यंत लस घेतली नाही. मात्र आता गावात लसीकरण सुरू असून सगळेच नागरिक घेत असल्याने आता लस घेणार.

- निरंजना दमाहे

-------------------------

गावात कोरोना लसीला घेऊन नागरिक नानाविध गोष्टी करतात. अशाच काही गोष्टींमुळे लस घेण्याचे टाळले. मात्र कोरोना लसीमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत नसून उलट कोरोनापासून बचाव होत असल्याचे आता नागरिक ऐकिवात आहे. त्यामुळे आता लस घेणार.

मीरा नागपुरे.

-------------------------

जिल्ह्यात आतापर्यंत २२.५५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.