शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

संशयित हत्तीरोग रुग्णाबाबत हिवताप विभाग उदासीन

By admin | Updated: August 18, 2014 23:33 IST

शहरातील वसंतनगरात शनिवारी (दि.१६) आढळून आलेल्या हत्तीरोगाच्या संशयित रूग्णामुळे शहरवासी आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येथील हिवताप विभागाचा कारभार

गोंदिया : शहरातील वसंतनगरात शनिवारी (दि.१६) आढळून आलेल्या हत्तीरोगाच्या संशयित रूग्णामुळे शहरवासी आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येथील हिवताप विभागाचा कारभार मात्र हवेतच दिसून येत आहे. त्या संशयित रूग्णाबाबत जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी लगेच कर्मचारी पाठवून रक्ताचे नमुने मागवून घेतो, असे आश्वासन दिले होते. मात्र सोमवारपर्यंत त्यांचा कर्मचारी रक्ताचे नमुने घेण्यासाठी गेला नव्हता. यावरून आपल्या अधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकाविणारा कर्मचारी किती निगरगट्ट आहे हे दिसून येते. सध्या डेंग्यू व मलेरियाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. शहारतही आता डेंग्यूचे रूग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातल्या त्यात शनिवारी (दि.१६) येथील नगराध्यक्षांच्या प्रभागात येणाऱ्या वसंतनगर भागात मधुकर बेहलपांडे नामक इमसात हत्तीरोगाची लक्षणे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत सदर प्रतिनिधीने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांना माहिती दिली. यावर डॉ. पाटील यांनी संशयित व्यक्तीच्या रक्ताचे नमुने रात्रीलाच घ्यावे लागत असल्याचे सांगत कर्मचारी पाठवून नमुने मागवून घेतो असे सांगितले होते. विशेष म्हणजे डॉ. पाटील यांनी सांगितल्यानंतरही सोमवारपर्यंत (दि.१८) त्यांच्या विभागातील कर्मचारी रक्ताचे नमुने घेण्यासाठी बेहलपांडे यांच्याकडे गेला नव्हता. बेहलपांडे यांना मंगळवारी त्रास उद्भवला व शनिवारी केटीएस रूग्णालयात गेल्यावर त्यांचे रक्ताचे व लघवीचे नमुने घेण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांचे नमुने घेऊ न त्यात ते पॉझिटीव्ह आढळल्यास त्वरीत त्यांच्यावर उपचार सुरू करून हा रोग आटोक्यात आणला जाऊ शकतो. शिवाय शहरात हत्तीरोगाचा रूग्ण आढळणे ही जिल्हा प्रशासनासह हिवताप विभागासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांनीही लगेच नमुने मागवितो असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र विभागाचा कर्मचारी संबंधीत व्यक्ती जाऊन रक्ताचे नमुने घेत नाही यावरून हिवताप विभाग आपल्या जबाबदारी प्रती किती तत्पर आहे हे दिसून येते. अशात अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरवशावर जिल्हावासी किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)