शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी सूक्ष्म नियोजन करा

By admin | Updated: December 30, 2016 00:54 IST

नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असलेला गोंदिया जिल्हा वनराईन आणखी बहरावा, त्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची लागवड करणे महत्वाचे आहे.

जिल्हाधिकारी काळे : चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्र म गोंदिया : नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असलेला गोंदिया जिल्हा वनराईन आणखी बहरावा, त्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची लागवड करणे महत्वाचे आहे. त्यामुळे ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र माअंतर्गत जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी विविध यंत्रणांनी योग्य समन्वयातून वृक्ष लागवडीसाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड कार्यक्रमासंदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, या कार्यक्रमाअंतर्गत येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांनी वृक्ष लागवडीची जागा निश्चित करावी. वृक्ष लागवडीसाठी आतापासूनच खड्डे खोदावे. तालुका पातळीवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तहसिलदारांशी दर महिन्याला समन्वय साधून वृक्ष लागवडीबाबत पाठपुरावा करावा. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी याबाबत तहसिल कार्यालयात बैठक घ्यावी असे ते म्हणाले. सभेला सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे, सहायक वनसंरक्षक यु.टी.बिसेन, एन.एच.शेंडे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जे.उदापूरे, वनविकास महामंडळाचे विभागीय वनाधिकारी पी.जी.नौकरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, कृषी विभागाच्या उपसंचालक अश्वीनी भोपळे, गोंदिया एसटी आगाराचे व्यवस्थापक एन.आय.झाडे, बाघ इिटयाडोह पाटबंधारे विभागाचे ए.पी.नशिने, उपसा सिंचन प्रकल्प विभागाचे डी.बी.रहांगडाले, तसेच जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यावेळी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) ३५ विभागांना दिले उद्दीष्ट यावेळी उपवनसंरक्षक डॉ.रामगावकर म्हणाले, विविध ३५ विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. वन विभाग ४ लाख १७ हजार, ग्रामपंचायती अंतर्गत २ लाख २१ हजार, विविध यंत्रणा १ लाख ५१ हजार, वन विकास महामंडळ २ लाख आणि सामाजिक वनीकरण विभाग २ लाख असे एकूण ११ लाख ८९ हजार वृक्षांची लागवड येत्या जुलै महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये साग, बेहडा, हिरडा, बांबू, आवळा, खैर, अंजन यासह जंगलातील अनेक वृक्षांची व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.