शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:29 IST

नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.

ठळक मुद्देकांदबरी बलकवडे : पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (दि.२५) आयोजीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मान्सून पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक, भंडाराचे अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी ए.के. घोरमारे, बालाघाट जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता एस.एस.गहरवार, संजय सरोवर प्रकल्प (शिवनी) कार्यकारी अभियंता पी.सी.महाजन, गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी क्रि ष्णा रेड्डी, भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी मान्सून कालावधीत अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे जिल्हा व इतर भागात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जलसंपदा व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून पूर परिस्थिती आटोक्यात आणण्याचे कार्य करावे. धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करु न गावातील नागरिकांना पूर्वसूचना देवून पाणी सोडावे व त्यानंतर नदीच्या पातळीची सूचना संबंधित विभागांनी जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक आहे. अचानक उद्भवणाºया नैसर्र्गिक आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहावे अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. वैनगंगा, बाघ तसेच इतर उपनद्यांमुळे जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये पूर परिस्थितीचा संभाव्य धोका आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमधील पूर परिस्थितीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करु न सुक्ष्म नियोजन करावे. यासाठी धान्यसाठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास सज्ज ठेवावा असेही त्यांनी सांगीतले.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला संरचना तपासणी, नगर परिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रात नाले- नाली सफाई, अतिक्र मण धारक तथा जीर्ण असलेल्या इमारतींना नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. भारतीय हवामान खात्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना-इशारा यासंदर्भात पूर्व माहिती मिळवून योग्य नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात सरासरी १३२७.४९ मि.मी. पाऊस पडतो. गोदिया जिल्ह्याच्या शेजारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा असून या बालाघाट व राजनांदगाव जिल्ह्यात पडणारा पाऊससंजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रवेश करतो. संजय सरोवर (मध्य प्रदेश) येथून सुटणारे विसर्गाचे पाणी २५ तासांत वैनगंगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचते. तसेच शिरपूर देवरी येथून सुटणारे विसर्गाचे पाणी २७ तासांत बाघनदीच्या माध्यमातून रजेगाव घाटपर्यंत येते. यादरम्यान, धरणातून सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली.पोलीस अधीक्षक साहू यांनी, पोलीस यंत्रणेला पूर परिस्थितीच्या काळात संवादाची माध्यमे ही प्रभावीपणे कार्यरत ठेवावी. तसेच मोबाईल-इंटरनेट सेवा व संवादाचे इतर माध्यम विस्कळीत झाल्यास वायरलेस यंत्रणेने दक्षता बाळगून कार्य करावे असे निर्देश दिले.बैठकीला बालाघाट (म.प्र.), सिवनी (म.प्र.), भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रमुख, तसेच महसूल व पोलीस खात्यातील विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता आर.एस. सोनटक्के यांनी मांडले. सादरीकरण वाय.एन.राठोड यांनी केले. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. आभार उपविभागीय अभियंता बी.बी. बिसेन यांनी मानले.व्हॉट्सअ‍ॅपवरून नागरिकांना सूचना द्याजिल्ह्यातील पूर परिस्थितीला बघता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करु न पूर परिस्थितीची पूर्वसूचना नागरिकांना दयावी. तसेच पूर परिस्थितीत टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करु न आपत्तीवर मात करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी दिल्या.