शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त अभियान यशस्वी करा

By admin | Updated: May 11, 2015 00:27 IST

येत्या पाच वर्षात टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही एक चालून आलेली संधी ...

अनुपकुमार यांचे प्रतिपादन : टंचाईसदृश स्थितीवर मात करण्याची संधीगोंदिया : येत्या पाच वर्षात टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही एक चालून आलेली संधी समजावी. तसेच ग्रामस्थांनी या अभियानाला आपले अभियान समजून सहभागी व्हावे व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन नागपूरचे विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवार (दि.९) जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व धडक सिंचन विहीर कार्यक्रमाचा आढावा घेताना आयुक्त अनुपकुमार बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर आयुक्त हेमंत पवार, उपवनसरंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) बकूल घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त अनुपकुमार पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यापासून आढावा बैठकीला सुरूवात केली आहे. या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये, हा उद्देश असून या जिल्ह्याने अनेक प्रकल्प व योजनेत चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलयुक्त शिवार अभियान हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. मोहीम स्वरूपात हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात या अभियानाची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे. लोकसहभागावर हे अभियान अवलंबून आहे. लोकांच्या मागणीनुसार माजी मालगुजारी तलावांची दुरूस्ती करण्यात यावी. यंत्रणांनी शेतकऱ्यांना तलावातील गाळाची उपयुक्तता पटवून द्यावी. त्यामुळे ते तलावातील गाळ शेतात टाकण्यास तयार होतील. गाळामुळे शेतातील पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवण क्षमतादेखील वाढणार आहे. अनुपकुमार पुढे म्हणाले, जिल्ह्यात पाण्याचा वापर उपलब्ध सिंचन क्षमतेच्या २२ टक्के इतका आहे. तो वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजीपाला पिकात वाढ होण्यास मदत होईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे योग्यप्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त मजुरांंना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत विकासकामे करता येईल. विशेष घटक योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांची निवड करावी. धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. शनिवारपासून सुरू करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि अटल पेंशन योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने काम करावे, असेही आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी जिल्ह्यात ९४ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली असून मागील पाच वर्षांत ज्या गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, अशा गावांची निवड या अभियानात करण्यात आल्याचे सांगितले. प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) बकूल घाटे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत, तर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पुराम यांनी धडक सिंचन विहिरी कार्यक्रमांबाबत माहिती दिली. सभेला अंमलबजावणी यंत्रणाचे प्रमुख अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ३१६ कामे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात जिल्हा महत्वपूर्ण टप्यावर आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ३१६ कामे सुरू आहे. गावातील नागरिकांचा या अभियानात सहभाग वाढला असून ट्रॅक्टरव्दारे शेतात गाळ टाकण्याचे काम करण्यात येत आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या वाढणार असून जलयुक्त शिवार अभियानामुळे रबी पिकांचे क्षेत्र वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अपर आयुक्त पवार यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तांत्रिकदृष्ट्या जलयुक्त अभियानाचे योग्य नियोजन करावे, असेही सांगितले.