शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वित्तीय व्यवस्थापन आणि जोडव्यवसायाची कास धरा

By admin | Updated: December 31, 2016 01:36 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती तशीही हलाखीची असते. अशात जनावरांच्या महागड्या चाऱ्याची खरेदी करण्यात

सभापती शिवणकर यांचे आवाहन : सकस आहार तयार करण्याचे प्रशिक्षण इसापूर : शेतकऱ्यांची परिस्थिती तशीही हलाखीची असते. अशात जनावरांच्या महागड्या चाऱ्याची खरेदी करण्यात अधिक तोटा आहे. अशात जनावरांचे खाद्य घरीच तयार केल्यास शेतकऱ्यांचे पैसे वाचतील. शेतकऱ्यांनी वित्तीय व्यवस्थापन व जोड व्यवसायाची कास धररून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी केले. वित्तीय व्यवस्थापन व सकस जनावर चारा तयार करण्याचे प्रात्यक्षीक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती आशा झिलपे तर वित्तीय व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य लेखा अधिकारी जवंजाळ व सहायक पशुधन आयुक्त ए.डी.डांगोरे उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्य लेखा अधिकारी जवंजाड यांनी, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे वेगवेगळे फंड व त्यांचे कार्य कसे चालते ते समजावून पं.स. पदाधिकाऱ्यांना त्याची इत्थंभूत माहिती दिली. पदाधिकारी जर शिकले तर ते आपल्या भागाचा सर्वांगिण विकास करुन ग्रामीण भागातून विकास प्रवाहात आणतील तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे कार्य समजावून सांगितले. तर सहाय्यक पशुधन आयुक्त डांगोरे यांनी, महागडे सकस आहार खरेदी करणे व जास्त खर्चात गेल्याने बळीराजाच्या उत्पादन खर्चात वाढ होते. त्यापेक्षा आपल्या जनावरांना महागडे पशुखाद्य देणे टाळून कमी खर्चात जनावरांना सकस आहार देण्यासाठी १ किलो तणसावर ६० लीटर पाणी, ३ किलो युरिया, १ किलो मीठ यांचे द्रावण बनवून तणसावर शिंपळून ३ ते ४ आठवडे हवाबंद स्थितीत ठेऊन नंतर गुरांना थोडे-थोडे जनावरांना खाऊ घातल्यास त्यांना सुग्राससारखे पोष्टीक आहार यातून मिळतो हे सर्वांना प्रात्याक्षिकासह समजावून सांगून अल्पखर्चात जनावरांचे व्यवस्थापन समजावून सांगितले. या प्रशिक्षणाला पं.स.समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ.एल.के. बारापात्रे, डॉ.एन.झेड. लुटे, डॉ. दीपक मदीकुंटावार, डॉ. बावणे, सुखदेव राऊत, दिनेश राऊत, हिरेश भोयर, शिशूपाल डोंगरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)