शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ८२ लाखांचा फटका

By admin | Updated: June 20, 2016 01:29 IST

एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे.

गोंदिया : एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीही सुटली नसून या अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्यामुळे महावितरणला सुमारे ८२.१३ लाखांचा फटका बसला आहे. यंदा उन्हाने चांगलेच चटके दिले व त्यावर अवकाळी पावसाने थंडावा दिला. एप्रिल व मे महिन्यातील या उन्हासोबतच अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने जिल्ह्यातील वातावरण बदलून टाकले होते. पाऊस व तुफानामुळे या दोन महिन्यांत पावसाळा सुरू झाल्याचाही अनूभव आला. मात्र हा अवकाळी पाऊस जेवढा नुकसानकारक ठरला, तेवढेच नुकसान वादळीवाऱ्याने केले. या पाऊस व वादळीवाऱ्यामुळे कोठे झाडे पडली, तर कोठे घरांची पडझड झाली. तर पावसाने पिकांची नासाडी करून सोडली. अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. एप्रिल व मे महिन्यातील या वादळीवाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे ८२.१३ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यात एप्रिल महिन्यात १६.९० लाखांचे नुकसान झाले असून मे महिन्यात ६५.२३ लाखांचे नुकसान झाले आहे. वादळीवाऱ्यामुळे कोठे विज पोल पडले तर कोठे वाहिन्या तुटल्या. विद्युत रोहित्रांतही बिघाड आला व अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला होता. या नुकसानीमुळे कंपनीची चांगलीच पंचाईत झाली असून दुरूस्तीसाठी कसरत सुरूच आहे. (शहर प्रतिनिधी)२४ विद्युत रोहित्रांत बिघाड वादळीवाऱ्याच्या कहरामुळे पोल व वाहिन्या तुटल्या असतानाच विद्युत रोहित्रही यापासून सुटले नाहीत. यामध्ये एप्रिल महिन्यात गोंदिया विभागात ९ विद्युत रोहित्रांत बिघाड आला तर मे महिन्यात एकूण १५ रोहित्रांत बिघाड आला असून त्यात गोंदिया विभागातील १२ तर देवरी विभागातील ३ रोहित्र आहेत. अशाप्रकारे रोहित्रांमधील बिघाडामुळे कंपनीला २२.४० लाखांचे नुकसान झाले आहे. जून महिन्यातही नुकसानी सुरूच एप्रिल व मे महिन्यात झालेली नुकसानी तेथेच संपली नसून जून महिन्यातही नुकसानीचे हे सत्र सुरूच असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नुकसानीमुळे महावितरण त्रस्त झाले असतानाच देखभाल दुरूस्तीची कामे वाढली आहेत. दुरूस्ती झाल्यानंतर पुन्हा तुटफूट होत असल्याने दुरूस्तीसाठी कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. ७७६ पोल पडले वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यातील ७७६ पोल पडले आहेत. यात १७९ उच्चदाब व ५९७ लघुदाब पोल असून एप्रिल महिन्यात ५६ उच्चदाब व १६३ लघुदाब व मे महिन्यात १२३ उच्चदाब व ४३४ लघुदाब पोल पडले आहेत. विभागनिहाय बघितल्यास, एप्रिल महिन्यात गोंदिया विभागात ३१ उच्चदाब व ८६ लघुदाब तर देवरी विभागात २५ उच्चदाब व ७७ लघुदाब पोल पडले आहेत. तसेच मे महिन्यात गोंदिया विभागात ७४ उच्चदाब व १६७ लघुदाब तर देवरी विभागात ४९ उच्चदाब व २६७ लघुदाब पोल पडले आहेत. अशाप्रकारे पोल तुटल्याने महाविरणला सुमारे ३९.४४ लाखांचे नुकसान झाले आहे. १३४ किमी. वाहिनी तुटली पोल तुटले असतानाच जिल्ह्यात १३४.२२ किमी. वीज वाहिन्या तुटल्या आहेत. यात १६.९ किमी. उच्चदाब व ११७.३२ किमी. लघुदाब वाहिन्या असून एप्रिल महिन्यात ३.७८ किमी. उच्चदाब व ९.२ किमी. लघुदाब तर मे महिन्यात १३.१२ किमी. उच्चदाब व ९१.२२ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. विभागनिहाय बघितल्यास, एप्रिल महिन्यात गोंदिया विभागात १.६८ किमी. उच्चदाब व २.४२ किमी. लघुदाब तर देवरी विभागात २.१ किमी. उच्चदाब व ६.७८ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. तसेच मे महिन्यात ८.१० किमी. उच्चदाब व २३.१६ किमी. लघुदाब तर देवरी विभागात ५.०२ किमी. उच्चदाब व ६८.०६ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. यातून एकूण सुमारे २०.२७ लाखांचे नुकसान झाले आहे.