शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये टीटीई करताहेत लूट

By admin | Updated: May 22, 2014 01:17 IST

आरक्षण नसलेल्या प्रवाशांकडून थेट ५0 रुपये लुटले जात असल्याचा प्रकार गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस या रेल्वेगाडीत कार्यरत टीटीईकडून होत आहे.

गोंदिया : आरक्षण नसलेल्या प्रवाशांकडून थेट ५0 रुपये लुटले जात असल्याचा प्रकार गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस या रेल्वेगाडीत कार्यरत टीटीईकडून होत आहे. त्यामुळे प्रवाशांत कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.

प्रचाशांची वाढती संख्या पाहून वर्षभरापूर्वी रेल्वे प्रशासनाने दररोज गोंदिया येथून सुटणारी गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरु केली. आधीपासूनच प्रवासी या गाडीत आरक्षण नसतानाही शयनयान बोगीत असून नागपूरपर्यंंंत प्रवास करीत आले आहेत. त्यातच आताही सर्वच प्रवासी नागपूरपर्यंंत सामान्य तिकीट काढून आरक्षित डब्यात बसून प्रवास करतात.

जास्तीत जास्त प्रवासी अनारक्षित प्रवास करीत असल्याने तिकीट निरीक्षक, रेल्वे प्रशासन नागपूरपर्यंंंत नियम शिथिल ठेवतात. परंतु काही लोभी टीटीईंनी यावरही पैसे कमावण्याचा उपाय शोधून काढला आहे. दररोज नागपूरपर्यंंंत जाणार्‍या प्रवाशांना आरक्षित डबा आहे. यात बसता येत नसल्याचे सांगून त्यांना दुसर्‍या डब्यात जाण्याचे सांगून त्यांच्याकडून ५0 रुपयांची मागणी केली जात आहे.

ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या प्रवाशांना उठावे लागते. तर हा प्रकार अनारक्षित प्रवाशांसह केला जात नाही तर ग्रामीण भागातील आलेल्या प्रवाशांसोबत अधिक प्रमाणात केला जातो. प्रवाशांना थेट ५0 रुपयाची मागणी केली जाते व त्यांना आरक्षण झाल्याचे सांगितले जाते. यातच दरदिवशी अप-डाऊन करणारे बोलताच ५0 रुपये देताना दिसतात. तर आरक्षणाची कसलीच पावतीही दिली जात नाही.

आरक्षणाच्या नावावर दररोज गोळा होणारा पैसा शासनाच्या तिजोरीत की टीटीईच्या खिशात जाते, हे कळत नाही. एखाद्या प्रवाशाने आपल्या नावाची वरिष्ठांकडे तक्रार करु नये यासाठी कोटावरील नेमप्लेट खिशात ठेवतात. दरम्यान एखाद्याने ५0 रुपये दिल्याची पावती मागितल्यास त्याला कारवाईचा दम दिला जातो. त्यांना नाईलाजाने पैसे द्यावे लागतात. दुसरा कोच शोधावा लागतो. या रेल्वेगाडीने दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात.

प्रत्येकी ५0 रुपयाप्रमाणे कार्यरत टीटीई एकाच दिवशी हजारो रुपये अवैधरित्या कमावतात. हा सर्व प्रकार दररोज चालतो. प्रवास करायचा असल्याने कुणीही याची तक्रार कुठेही करताना दिसत नाही. मात्र या प्रकाराबाबत प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)