शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Maharashtra Election 2019 ; गोंदियात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असाच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

पक्षाकडून उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना डावलले गेल्याने गोंदिया,आमगाव, तिरोडा या मतदारसंघात पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. तर मागील पंधरा वर्षांपासून विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल हे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत आहेत.

ठळक मुद्देशहरी भागातील मते ठरणार निर्णायक : बंडखोरीमुळे मतांचे विभाजन, प्रामाणिकतेची लागणार कसोटी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून प्रचारात शेवटच्या दोन दिवसात कोण बाजी मारतो हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाच प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरा सामना हा भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल आणि भाजपमधून बंडखोरी करुन अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विनोद अग्रवाल यांच्यातच आहे. त्यामुळे अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असाच सामना रंगणार आहे. प्रचारात सध्या या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली असली तरी शहरी भागातील मते ‘गोंदियाचा आमदार कोण’ हे ठरविणार आहेत.पक्षाकडून उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना डावलले गेल्याने गोंदिया,आमगाव, तिरोडा या मतदारसंघात पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. तर मागील पंधरा वर्षांपासून विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल हे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली.त्यामुळे ते या मतदारसंघातून चौथ्यांदा नशीब आजमावित आहेत. त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड सुध्दा आहे. तर मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघातून तयारी करीत असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांना ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. दहा वर्षांपासून या मतदारसंघात त्यांचा सुध्दा चांगला जनसंपर्क असून भाजपमधील काही असंतुष्टांची मते त्यांच्या पथ्यावर पडण्याची चर्चा आहे. तर काँग्रेसने अमर वºहाडे यांना उमेदवारी दिली असून ते दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत नवखे आहेत.वंचित बहुजन आघाडीने जनार्धन बनकर आणि बसपाने धुरवास भोयर यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही गोपालदास अग्रवाल विरुध्द विनोद अग्रवाल अशीच होणार आहे.या मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख २१ हजार ७७८ मतदारांचा समावेश आहे.मतदारसंघातील सध्याचे वातावरण पाहता ग्रामीण भागावर गोपालदास अग्रवाल यांनी चांगली पकड मजबूत केली आहे.मात्र शहरीभाग हा भाजपबहुल मानला जातो. तर विनोद अग्रवाल हे सुध्दा मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते. आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. तर गोपालदास अग्रवाल हे भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने शहरी भागातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते किती पक्ष निष्ठा आणि प्रामाणिकतेने काम करतात यावरच विजयाचे अंतिम समीकरण ठरणार आहे. तर हा मतदारसंघ काँग्रेसचा गड असला तरी नवखा उमेदवार दिल्याने हा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.एकंदरीत दोन्ही अग्रवालांनी प्रचारात जी आघाडी घेतली आहे ती २१ आॅक्टोबरपर्यंत कायम राहिल्यास सामना चांगलाच रंगतदार होण्याची शक्यता आहे.कुणीही निवडून आले तरी इतिहासगोंदिया विधानसभा मतदारसंघ अस्तीत्त्वात आल्यापासून सलग चारवेळा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. तर अपक्ष उमेदवार सुध्दा या मतदारसंघातून निवडून आलेला नाही. त्यामुळे गोपालदास अग्रवाल ंिकंवा विनोद अग्रवाल निवडून आले तरी तो या मतदारसंघाचा इतिहासाच होणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल