शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना मशीनचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 02:16 IST

बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्याची संधी विविध मार्गाने महिलांना मिळत आहे.

अगरबत्ती उत्पादन : दिवसभरात बनवताहेत ६० ते ७० किलो अगरबत्त्याकाचेवानी : बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्याची संधी विविध मार्गाने महिलांना मिळत आहे. यातूनच बचतगटाच्या कर्जातून काही महिलांनी अगरबत्ती तयार करण्याची मशीन घेवून आपला स्वयंरोजगार सुरू केला आहे.बरबसपुरा येथील बचतगटाला बँकेने साडे तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यातून सरपंच ममता यादोराव लिचडे यांनी अगरबत्ती तयार करण्याची मशीन घेवून स्वयंरोजगाराची सुरुवात केली आहे. एक लाख २५ हजार रुपयंची मशीन आणि २५ हजारांचे इतर साहित्य असे एकूण दीड लाख रुपये मशीनसाठी लागले. वीजेवर चालणाऱ्या या मशीनवर १२ तास नियमीत अगरबत्ती बनविण्याचे काम केले तर ५० ते ६० किलो उत्पन्न काढल्या जाऊ शकते. कंपनी ७० किलो उत्पन्न देत असल्याचे सांगते. मात्र आपण इतके उत्पन्न काढले नसल्याचे लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले.अगरबत्ती तयार करण्याकरिता लागणारे साहित्य महाग असल्याने पाहिजे तसा लाभ मिळताना दिसत नाही. लागणाऱ्या काड्या ११५ रु. किलो, मसाला ३५ रु. किलो आणि चिकी (गोंद) ४० रुपये किलो बाजारातून घ्यावे लागते. एक किलो अगरबत्ती तयार करण्याकरिता ४० रुपये खर्च येत असून बाजारात विक्री करताना ५६ रुपये किलो प्रमाणे देण्यात येते. एका किलोमागे १५ ते १७ रुपये आपल्याला मिळत असल्याचे लिचडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.बचत गटाला ही मशीन नाबार्ड योजनेमधून देण्यात आली असून घेतलेले कर्ज दोन वर्षात चुकते करायचे आहेत. नियमित कांड्या तयार करण्याचे काम केले तर हे व्यवसाय परवडण्यासारखे आहे. हाताळतांना यावेळी थोडाफार त्रास होत असल्याने पाहिजे तसे उत्पन्न काढता येत नाही. तरीपण बँकेची किश्त भरुन आपला घर खर्च भागतो असेही लिचडे यांनी सांगितले. बरबसपूरा येथील सुनील चौधरी यांनी सुद्धा अगरबत्ती तयार करण्याचे यंत्र आणल्याने हाताने अगरबत्ती तयार करताना दिवसाला २५ ते ३० रुपये रोजी मिळत नव्हती. ती याद्वारे आपल्याला परवडणारी असल्याचे सांगितले. (वार्ताहर)