शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणी पुरवठा योजनेला अधिकार्‍यांचा खो

By admin | Updated: May 23, 2014 00:03 IST

ग्रामपंचायत आमगावअंतर्गत पोलिस स्टेशनजवळ वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र या नळयोजनेला टाकीत पाणी सोडणारे पाईप अजूनपर्यंत पोहोचले नाही.

आमगाव : ग्रामपंचायत आमगावअंतर्गत पोलिस स्टेशनजवळ वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र या नळयोजनेला टाकीत पाणी सोडणारे पाईप अजूनपर्यंत पोहोचले नाही. यात वेगवेगळ्या अधिकार्‍यांकडून पत्राद्वारे कारवाही करण्याचे संकेत दिल्याने सध्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला खो मिळाला आहे. ग्रामपंचायत आमगाव येथे लोकसंख्येचा विचार करता वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या नळ योजनेचे काम पूर्णत्वास गेले. मात्र काहींनी या नळयोजनेचा मुद्दा प्रमुख समस्या बनवून सर्वसामान्यात आपली सर्वसामान्यात बैठक जमविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच या वाढीव नळयोजनेला नगरातील मुख्य मार्गानी पाईपद्वारे पाणी येणे गरजेचे आहे. मात्र रस्त्याचे खोदकाम झाले नाही. त्यात अनेक अडचणी तयार झाल्या आहेत. नुकतेच नगरातील मुख्य मार्गावर डांबरीकरण करण्यात आले. जर नाली खोदकामाकरिता काम सुरू केले तर रस्त्याची मोठी दयनीय हालत होईल. तसेच मुख्य मार्गावर टेलीफोन तार टाकले असल्ळाने खोदकाम करतेवळी संपूर्ण टेलिफोनचे तार विस्कळीत होतील. याचा परिणाम नगरातील नागरिकांना होईल. आता नाली खोदकाम करुन त्यात पाईप टाकणे सुरू केले तर केलेल्या डांबरी करणाची दुर्दशा होईल. तसेच टेलिफोन सेवा विस्कळीत होईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टेलीफोन विभागाने ग्रामपंचायत आमगावला लेखी पत्र देवून सदर खोदकाम थांबविण्याच्या संदर्भात पत्र दिल्याचे समजते. एकंदरित वाढीव पाणी पुरवठा सुरू व्हावी ही सर्व सामान्यांची मागणी आहे. तर काहींनी या नळ योजनेला मोठा राजकीय मुद्या बनवून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. एकंदरित पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून राजकीय भांडवल करण्याचा हा प्रयत्न असल्याचा हा प्रकार असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. अधिकार्‍यांच्या आरोप-प्रत्यारोपात सध्या वाढीव पाणी पुरवठा नळ योजना फसली आहे. तिला आता कोण तारणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)