शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

वजन काट्यांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट

By admin | Updated: September 15, 2015 04:30 IST

ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाचे वजन तंतोतंत असावे यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावण्यात आले. परंतु

रावणवाडी : ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाचे वजन तंतोतंत असावे यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावण्यात आले. परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षपणामुळे त्यातही ग्राहकांची सर्रासपणे लूट केली जात आहे.‘जसा दाम तसा माल’ अशी अपेक्षा ग्राहकांची असते. पण बाजार पेठेतील दुकानदार वापरत असलेल्या वजन काट्यांनी ग्राहकांची ही अपेक्षा निराश करणारी ठरत आहे. मालाची योग्य किंमत देवूनही कमी वजनाचे माल दुकानदाराकडून विकत घ्यावे लागते. अशात तक्रार करावी तर कुठे, असा प्रश्न ग्राहकांसमोर उपस्थित झाला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही प्रत्येक दिवशी बाजार भरत असतो. खेडेगावातील लोक किफायतशीर भावाने आवश्यक वस्तू मिळतील, अशी अपेक्षा बाळगून वस्तू खरेदीसाठी बाजारात येतात. मात्र बाजारात दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांकडे परवाना असलेले वजन काटे उपलब्ध राहत नसल्यामुळे ग्राहकांची लूट होत आहे. बऱ्याच विक्रेत्यांकडे १०, २० व ५० ग्रॅमचे वजनही उपलब्ध नसतात. त्या आकाराचे दगड किंवा अन्य वस्तूंचा वजन म्हणून सर्रासपणे वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण दोन्ही भागात वजन काट्यांना पासिंग करवून घेण्याकरिता प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी शिबिर घेतले जातात. मात्र आठवडी बाजारातील दुकानदारांकडे पासिंग केलेले वजन काटे आढळत नाहीत. त्यामुळे दुकानदारांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आठवडी बाजारात योग्य दरात कमी वजनाच्या वस्तू विकत घ्यावे लागतात. हा प्रकार माहीत असूनही कोणताही ग्राहक याबाबत तक्रार करताना दिसून येत नाही. त्यामुळेच वजन काटे प्रमाणित नसलेल्या दुकानदारांचे फावते आहे. ग्राहकांना योग्य भावात योग्य माल मिळण्यासाठी वजनमाप निरीक्षकांनी अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र बाजारात असा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडे या विभागाकडून दुर्लक्ष का करण्यात येते, असा प्रश्न जागरूक ग्राहकांकडून विचारला जात आहे.सदर प्रकार वजनमाप विभागाला माहीत असला तरी दुकानदारांवर कारवाई केली जात नाही. तसेच याकडे सदर विभाग हेतूपुरस्परपणे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. वजन माप प्रमाणित नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई केल्यास ग्राहकांची होणारी लूट थांबू शकेल, अशी अपेक्षा ग्राहकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)