शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भजेपार येथे शिक्षक देण्यासाठी आज कुलूप ठोको आंदोलन

By admin | Updated: July 31, 2014 00:07 IST

सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता आज कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन गावकऱ्यांनी खा. अशोक नेते,

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता आज कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन गावकऱ्यांनी खा. अशोक नेते, जि.प. अध्यक्ष गोंदिया, शिक्षण सभापती जि.प. गोंदिया, खंडविकास अधिकारी सालेकसा, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार, ठाणेदार सालेकसा यांना सादर करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, पंचायत समिती सालेकसा अंतर्गत भजेपार येथे जि.प. शाळेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असून शासनाच्या निर्णयानुसार आठवा वर्ग सुरु करण्यात आला. सदर वर्गात एकूण ३१ विद्यार्थी आहेत. मात्र आठवा वर्ग सुरु होऊनही शिक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. वर्ग पहिली ते सातवीपर्यंतची विद्यार्थी संख्या १८२ असून केवळ सहा शिक्षक उपलब्ध आहेत. विद्यार्थी संख्येनुसार सदर शाळेत एक उच्चश्रेणी मुख्याध्यापक तसेच दोन पदवीधर शिक्षकांची जागा उपलब्ध आहे. मात्र शिक्षण विभागाने अजुनही शिक्षकांची सोय केलेली नाही. आठवा वर्ग उघडूनही शिक्षण विभागाने त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती न केल्याने सदर वर्गाला कोण शिकविणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शाळा व्यवस्थापन समिती, पालक तसेच गावकरी यांनी अनेकदा शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी केली. परंतु याकडे कानाडोळा केल्याने उद्या (दि.३१) गुरुवारला सकाळी १०.३० वाजता शाळा समिती व पालकांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. तसेच आठव्या वर्गाला शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला आहे.यात शाळा समितीचे अध्यक्ष अशोक तुकाराम मेंढे, उपाध्यक्ष छाया गायधने, उपसरपंच तुकाराम फुंडे, महेश चुटे, संगीता ब्राम्हणकर, बाळकृष्ण हेमने, शामराव कलचर, माया गायधने, विनोद ब्राम्हणकर तसेच पालक वर्ग यांचा समावेश आहे. (वार्ताहर)