शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 01:45 IST

शिक्षकांची मागणी करून शिक्षक दिले जात नसल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी ग्राम दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल ...

दवनीवाडा जि.प.शाळा : गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा परसवाडा : शिक्षकांची मागणी करून शिक्षक दिले जात नसल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी ग्राम दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला अखेर गुरूवारी (दि.५) कुलूप ठोकले. विशेष म्हणजे प्रकरणावर तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन भडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येत असलेले दवनीवाडा येथील जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय ब्रिटीश कालीन आहे. शाळेने चांगले नाव लौकीक केले आहे. पण जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष व पदाधिकाऱ्यांच्या राजकारणने या शाळेची दुर्दशा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेत वर्ग ५ ते १२ वीपर्यंत कला व विज्ञान शाखेत विद्यार्थी शिक्षण घेतात. पण शाळेत पाच-सहा वर्षापासून शिक्षकांची कमतरता आहे. यासाठी शाळा समिती व गावकरी शिक्षकांची मागणी करीत दरवर्षी निवेदन देतात. मात्र एकही शिक्षक दिले जात नाही. यामुळे मुले-मुली खासगी शाळेत धाव घेत आहेत. जिल्हा परिषदेचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने गावकऱ्यांनी गुरूवारी (दि.७) शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता व त्यानुसार शाळेला कुलूप ठोकण्यात आले. गावकऱ्यांनी एकही शिक्षकाला आत जाऊ दिले नाही. तर विद्यार्थीही बाहेर ठाम राहिले. प्रकरणी मुख्याध्यापकाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोनद्वारे सांगितले. यावर दुपारी ३ वाजता गटशिक्षणाधीकारी डोये आले व त्यांनी दोन शिक्षकांना तिरोडा वरुन फोनवरुन बोलावले. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना बोलाविल्याचे डोये यांनी सांगीतले. तसेच पिरेडनुसार त्यांना पगार दिला असल्याचेही त्यांनी सांगीतले. मागील वर्षीही शाळा व्यवस्थापनाने शिक्षक ठेवले पण त्यांचे वेतन अजूनही दिले नाही. अखेर शाळेतील शिक्षक, पालक यांनी आपल्या जवळून दिले असल्याचे पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे यांनी सांगितले. प्रकरणी मार्ग निघाला नसून तिव्र आंदोलनाचा इशारा गुड्डू लिल्हारे, सरपंच तिजा मस्करे, नीरज सोनेवाने, राजेश उरकुडे, लांजेवार, धपाडे, नागपुरे व पालकवर्गाने दिला आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळेत बसणार नाही असा पवित्रा विद्यार्थी वर्गानेही घेतला आहे. (वार्ताहर)