शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली सजीव सृष्टी

By admin | Updated: March 22, 2015 00:55 IST

विविध कारणांमुळे वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराविविध कारणांमुळे वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सजीव सृष्टी ‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली आहे. निसर्गचक्र बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम सजीवांवर होत आहे. ऋतुंमध्ये होणारा बदल, गारपीट, अतिवृष्टी, वातावरणातील बदल हा त्याचाच परिणाम आहे. जंगलांचे संरक्षण करण्यासाठी वृक्षतोडीविरुद्ध जनजागृती करून वृक्ष लागवडीसाठी प्रबोधन करण्याची गरज बळावली आहे. भंडारा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी व तुमसर हे सात तालुके आहेत. भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, तुमसर, जांब (कांद्री), लेंडेझरी, नाकाडोंगरी आणि लाखांदूर या वनक्षेत्राचा समावेश आहे. या विभागात ३८ परिमंडळ असून नियत क्षेत्रांची संख्या १५६ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण ३,७१६.६५ भौगोलिक क्षेत्रापैकी १२०३.५५६ चौ.कि.मी. वनाचे क्षेत्र आहे. वनविभागाकडे ८८१.८५४ चौ.कि.मी., महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे ९१.४३६ चौ.कि.मी., वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौ.कि.मी. तर मोहघाटा रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौ.कि.मी. वन क्षेत्र आहे. ५००४७.११९ कि़मी. मध्ये राखीव, २७७.७६७ कि़मी. मध्ये संरक्षीत वन, ९९.६५४ कि़मी. मध्ये झुडपी जंगल तर ४.५१७ वर्ग कि़मी. मध्ये अवर्गीकृत क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यात तसेच परिसरात घनदाट जंगल व वन्यप्राण्यांच्या अधिवास आहे. या जंगलात वाघा सारख्या उमद्या प्राण्या सह बिबट, हरिण, अस्वल आदी वन्यप्राणी आहेत. तसेच साग व अन्य प्रजातींची मौल्यवान झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी प्रत्येक वनक्षेत्रात ३५ पानवठे आहेत. मानवाच्या जगण्याच्या प्रक्रियेत झाडांचा मोलाचा वाटा आहे. मात्र मानवाने झाडे तोडायला सुरूवात केली आणि त्याचा वापर करायला लागला. त्यामुळे जंगलाची तोड झाली आणि जंगलाचे प्रमाण घटले. जंगलतोडी बरोबर औषधीयुक्त झाडे तोडली जात आहेत.